ETV Bharat / state

बीडमध्ये आधार कार्डसाठी चिमुकल्यांची हेळसांड, दिवसभर थांबाताहेत बँकेत - childern

यावर्षीपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. आधार कार्ड असेल तरच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यामुळे पालक आधारकार्ड काढण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले.

बीडमध्ये आधार कार्डसाठी चिमुकल्यांची हेळसांड
author img

By

Published : Jul 11, 2019, 11:09 AM IST

बीड - यावर्षीपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. आधार कार्ड असेल तरच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यामुळे पालक आधारकार्ड काढण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले. विशेष म्हणजे चिमुकल्या मुलांनादेखील उपाशी-तापाशी पालकांबरोबर बँकेत रांगेत उभे राहावे लागत आहे.

शाळेवरच आधार कार्ड काढून देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बीडमध्ये आधार कार्डसाठी चिमुकल्यांची हेळसांड

बीड जिल्ह्यात नवीन आधार कार्ड काढणे व जुन्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. पूर्वी आधार कार्ड काढण्यासाठी अनेक सेंटर होते. मात्र, आता केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. प्रत्यक्षात आधार कार्ड काढणाऱ्यांची व दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत जी यंत्रणा कार्यरत आहे ती यंत्रणा अत्यंत तोकडी पडत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी चिमुकल्या मुलांना आपल्या पालकांबरोबर दिवस-दिवस बँकेच्या दारात रांगेमध्ये थांबावे लागत आहे.

गुरुवारी कोल्हारवाडी येथील पालक सकाराम धर्मे हे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला आधार कार्ड काढण्यासाठी बीड येथील युनियन बँकेत आले होते. मात्र, आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, आज तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी करता येणार नाही. बीड शहरातील शिवाजी चौक येथील युनियन बँकेत हा प्रकार घडला त्यानंतर आल्या पावलांनी धर्मेंना गावाकडे जावे लागले.

सोमनाथवाडी येथून विजय जाधव हे ३० किलो मीटरचा प्रवास करून बीड येथे आधार कार्ड काढण्यासाठी बँकेत आले होते. मात्र, आल्यानंतर त्यांना सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून परत पाठवले. अशा प्रकारामुळे चिमुकल्यांसह पालकांची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याकडे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी सांगितले.

Intro:चिमुकल्यांची हेळसांड; बीडमध्ये आधार कार्डसाठी चिमुकल्यांना केले बँकेतमध्ये रांगेत उभे

बीड- यावर्षीपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती केलेली आहे. आधार कार्ड असेल तरच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो. यामुळे पालक आधार कार्ड काढण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र बीड येथे गुरुवारी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे चिमुकल्या मुलांना देखील उपाशी-तापाशी पालकांबरोबर बँकेच्या दारात उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. शाळेवरच आधार कार्ड काढून देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Body:बीड जिल्ह्यात नवीन आधार कार्ड काढणे व जुन्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. पूर्वी आधार कार्ड काढण्यासाठी अनेक सेंटर होते मात्र आता केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. प्रत्यक्षात धार कार्ड काढणार्‍यांची व दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्या तुलनेत जी यंत्रणा कार्यरत आहे ती यंत्रणा अत्यंत तोकडी पडत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे या या बाबीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी चिमुकल्या मुलांना आपल्या पालकांबरोबर दिवस दिवस बँकेच्या दारात रांगेमध्ये थांबावे लागत आहे. गुरुवारी कोल्हारवाडी येथील पालक सकाराम धर्म हे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला आधार कार्ड काढण्यासाठी बीड येथील युनियन बँकेत आले होते. मात्र आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, आज तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी करता येणार नाही. बीड शहरातील शिवाजी चौक येथील युनियन बँकेत हा प्रकार घडला त्यानंतर आल्या पावली धर्मे यांना गावाकडे जावे लागले.

Conclusion:याशिवाय सोमनाथवाडी येथून विजय जाधव हे तीस किलो मीटरचा प्रवास करून बीड येथे आधार कार्ड काढण्यासाठी बँकेत आले. मात्र आल्यानंतर त्यांना सरोवर डाऊन असल्याचे सांगून परत पाठवले. या अशा प्रकारामुळे चिमुकल्यासह पालकांची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याकडे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.