ETV Bharat / state

Beed Suicide News: गरिबीचे भीषण वास्तव! दहा वर्षीय चिमुकल्याने केली आत्महत्या, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी - धारूर ग्रामीण रुग्णालय

बीड जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजीने चप्पल घेतली नाही म्हणून दहा वर्षीय चिमुकल्याने आत्महत्या केली आहे. तो मामाच्या गावात शिक्षण घेत होता.

Beed Suicide News
दहा वर्षीय चिमुकल्याने केली आत्महत्या
author img

By

Published : Feb 14, 2023, 7:39 AM IST

Updated : Feb 14, 2023, 7:56 AM IST

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अनेक तरुण आत्महत्या करताना आपण पाहत आहोत. जवळपास बीड जिल्ह्यात गेल्या एक वर्षांमध्ये 550 आत्महत्या झाल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. या तरुणांबरोबर लहान मुलांचाही तोल सुटतोय का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. युवराज श्रीमंत मोरे वय 10 वर्ष (रा. बोडखा कासारी) ता. माजलगाव असे या आत्महत्या केलेल्या लहान बालकाचे नाव आहे. या मुलाच्या मृत्युने गावावर शोककळा पसरली आहे.

काय आहे आत्महत्या मागचे कारण : या मुलाचे आई-वडील आपली इतर पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी, वडील श्रीमंत मोरे हे आपल्या मेहुण्याजवळ त्यांचा मुलगा युवराज याला ठेवून गेले होते. कारण मुलांना शिकावे, मोठे व्हावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते. या मुलाचे आई-वडील ऊसतोडणी मजूर आहेत. त्यामुळे आपल्या मुलाला आजीजवळ शिक्षणासाठी सोडून गेले होते. त्या मुलाने आपल्या आजीकडे चप्पल घेण्याची मागणी केली होती. मात्र घरात आर्थिक अडचण असल्याने आजीने चप्पल घेण्यास नकार दिला. याचाच राग त्याने मनात ठेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

किरकोळ कारणांनी युवराजला राग अनावर : हा मुलगा शिकावा मोठा व्हावा, अशी आई-वडिलांचे स्वप्न होते. म्हणून या दांपत्याने आपला मुलगा त्याच्या मामाच्या गावी शिक्षणासाठी ठेवला होता. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आजीने चप्पल घेण्यास नकार दिला. या किरकोळ कारणांनी युवराजला राग अनावर झाला. त्याने आई-वडिलांकडे जातो म्हणून तो रस्त्याने निघाला. वाटेतच त्याने आत्महत्या माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शवच्छेदन करण्यात आले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. आजूबाजूच्या परिसरात मुलाच्या आत्महत्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेडच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या : दुसरीकडे साताऱ्यातदेखील नुकतेच आत्महत्येची घटना समोर आली होती. प्रशांत मारफळे याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका फार्मसी महाविद्यालयात एम. फार्मला (मास्टर ऑफ फार्मसी) प्रवेश घेतला होता. केवळ दोनच दिवस तो कॉलेजला गेला. वाढे फाट्यावरील साई निवारा इमारतीमध्ये तो मित्रासोबत भाड्याने खोली घेऊन राहात होता. कॉलेजला गेलेला रूम पार्टनर सायंकाळी सा्डेपाच वाजता आला. त्याने खोलीचा दरवाजा वाजवला. परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशांत झोपला असेल, असे समजून त्याचा मित्र थोडा वेळ बाहेरच थांबला. पुन्हा दरवाजा वाजवला. तरीही आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस आल्यानंतर त्यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रशांत मारफळे याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : Father Raped On Daughter : बाप लेकीच्या नात्याला काळीमा; नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने हादरले रामनगर

Last Updated : Feb 14, 2023, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.