ETV Bharat / state

Beed Crime: जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची आत्महत्या; बीडच्या मानगुटीवर आत्महत्येचे भूत - ZP teacher suicide in Beed

आज सकाळी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेल्या एका शिक्षकाने आपले जीवन संपवले आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करतात, हे आपण पाहत आलो आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ जिल्ह्यातील नैराश्यातून जवळपास 570 जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीडच्या जनतेच्या मानगुटीवर आत्महत्येचे भूत तर बसले नाही ना? असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

Beed Crime
शिक्षरकाची आत्महत्या
author img

By

Published : Feb 14, 2023, 7:34 PM IST

बीड: बीड जिल्ह्यात काल एका दहा वर्षीय चिमुकल्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती आणि ही घटना ताजी असतानाच पुन्हा धारूर तालुक्यातील दहिफळ केंद्र अंतर्गत असलेल्या कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर करत असलेले शिक्षक नितीन लक्ष्मण पाटोळे (रा. आसरडोह, धारूर) यांनी आत्महत्या केली. ते आज सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडले. शाळेकडे चाललो असे सांगून ते शाळेकडे न जाता त्यांनी गावच्या पूर्वेस घरापासून काही अंतरावर एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 9 वाजता आसरडोह ता. धारूर येथे घडली. घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले.

गावात हळहळ:
नितीन लक्ष्मण पाटोळे यांनी आत्महत्या केल्याचे गावात समजतात पूर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आडस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सिद्धेश्वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र शिक्षकाने आत्महत्या का केली हे कारण अद्यापही समजू शकले नाही. माहितीप्रमाणे, जिल्हा परिषदेचे शिक्षक काही दिवसांपासून विचारमग्न होते. त्यांच्या मागे नेमके काय टेन्शन होते हे देखील अजून समजू शकले नाही. मात्र त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. मात्र या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मन मिळावू स्वभाव असलेल्या शिक्षकामागे असे नेमके कोणते टेन्शन होते की ज्यामुळे त्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे. याचा तपास पोलीस प्रशासन करत असून नेमके मृत्यूचे कारण काय आहे हे कळू शकले नाही.

अकरा महिन्यांत 501 आत्महत्या: आर्थिक विवंचना, वादविवाद, अपयश, नैराश्य, व्यसनाधीनतेसह इतर क्षुल्लक कारणांवरून थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याची मानसिकता वाढू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांपाठोपाठ इतरांचाही संयम ढळत असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात जानेवारी 2022 ते नोव्हेंबर 2022 या अकरा महिन्यांत तब्बल 501 जणांनी आपले जीवन संपविल्याची धक्कादायक माहिती आहे. यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, तणावरहित जीवनशैलीतून नैराश्येवर मात करणे शक्य असून त्यासाठी हिंमत व संयम गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बेरोजगारी मुख्य कारण: बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर या जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे अनेक तरुण शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी लागत नाही. व्यवसाय केला तर व्यवसायात यश येत नाही. त्यानंतर बीड जिल्ह्यात एमआयडीसीची आठ ठिकाणी शासनाने जागा आरक्षित केलेली आहे. मात्र बीड शहर सोडता बाकी इतर ठिकाणी तुरळक उद्योग उभे राहिलेले आहेत. तर काही एमआयडीसीच्या आरक्षित जागेत एकही उद्योग नसल्याचे चित्र या बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याचे सुद्धा या ठिकाणी निष्पन्न होत आहे. नैराश्यातून सुद्धा अनेक तरुण आपले जीवन संपवित असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्या विरोधात आमरण उपोषण, 4 कोटी 16 लाख थकवल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.