ETV Bharat / state

आष्टी शहरातील तलवार नदी खोलीकरण कामाचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ - ashti latest news

आष्टी शहरातून जात असलेली तलवार नदीचे नाम फाऊंडेशन, आष्टी नगरपंचायत, आमदार सुरेश धस मित्र मंडळ व लोकसहभागातून खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरण होत आहे.

तलवार नदी खोलीकरण कामाचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ

author img

By

Published : Apr 28, 2021, 9:34 PM IST

आष्टी(बीड) - आष्टी शहरातून जात असलेली तलवार नदीचे नाम फाऊंडेशन, आष्टी नगरपंचायत, आमदार सुरेश धस मित्र मंडळ व लोकसहभागातून खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभिकरण होत आहे. या कामाचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून भूजल अभियान अंतर्गत नदी खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी 28 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आला.

अनेक वर्षापासून आष्टी येथील जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी तलवार नदी मानवी अतिक्रमण, वेड्याबाभळी तसेच गाळामध्ये पूर्णपणे भरल्या गेल्याने तिचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. आष्टी नगरपंचायत पदाधिकारी व आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, गोरगरीब मजूर, नागरिक यांनी मिळून 4 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा केले. येथील नागरिकांनी लोकवर्गणी करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा संकल्प केला. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडून 20 लाख रूपये मिळाले. आष्टी येथील गावकऱ्यांनी आपल्या गावची जलवाहिनी तलवार नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून, हे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरण अभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी यंदा तर 300 ते 400 फुटावर गेली आहे. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील आष्टी येथील गावकऱ्यांनी आपल्या गावाची नदी खोलीकरणाचा निर्णय घेतला. यात गावातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी यांनी गावात फिरून गावक-यांकडून या कामासाठी साधारण चार लाखाची लोकवर्गणी जमा केली.

याशिवाय नाम फाऊंडेशन यांच्या कडून 20 लाख मिळणार आहेत. कामाचा शुभारंभ गावाजवळील तलवार नदीत पोकलॅण्ड मशीनने कामाचे उदघाटन आ.सुरेश धस यांच्या करण्यात आला. यावेळी आमदार धस म्हणाले, की या तलवार नदीखुलीकरण, रुंदीकरण, सुशोभिकरण कामासाठी गावातील ज्या सर्वसामान्यातील सामान्य नागरिक,व्यापारी तसेच कार्यकर्ते यांनी मदत केली आहे. त्याचे देखील आभार मानतो. तसेच नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर हे माझे खास मित्र आहेत. तसेच इतर गावातील नदीच्या खोलीकरणासाठी ही नाम फाउंडेशनकडुन निधी प्राप्त करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.