ETV Bharat / state

सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यास निलंबित करा, राष्ट्रवादीची मागणी

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी केली आहे.

सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यास निलंबित करा

author img

By

Published : May 3, 2021, 9:03 AM IST

बीड - जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र काही शासकीय कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी केली आहे.

सतत गैहजार राहणारे व नागरिकांशी उद्धटपणे वागणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे यांना येत्या आठवड्याभरात निलंबित करावे. अन्यथा त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करेन, असा इशारा पौळ यांनी प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात पौळ यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेले डॉ.सोमनाथ मुंडे कधीच तेथे हजर नसतात, याउलट त्यांचे लक्ष परळीच्या त्यांच्या खासगी दवाखान्यावर जास्त आहे. शासनाची पगार घेऊन जबाबदारीच्या कालावधीत खासगी प्रॅक्टिस करणे हा नियमाने गुन्हा आहे. सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्या परिसरात असणाऱ्या जवळपास 60 ते 65 गावांतील नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. डॉक्टर स्वतः गैरहजर राहून तेथील सगळा भार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपवून देतात.

कधी कुठल्या गोष्टीबाबत चौकशी करण्यासाठी फोन केला तर ते उद्धटपणे उत्तरे देऊन समोरच्याशी अरेरावीने बोलतात. असाच अनुभव मला स्वतःला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आला आहे असंही लक्ष्मण तात्या पौळ यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटलेल आहे. सर्व मुद्द्यांचा उल्लेख करून आरोग्य अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे यांनी केलेल्या अरेराविचा पुरावा म्हणून या निवेदनाच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सुद्धा पाठवण्यात आली आहे.

कारवाई करा अन्यथा आंदोलन -

आरोग्य अधिकारी मुंडे विरोधात दररोज कित्येक तक्रारी नागरिक करत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.