बीड - रेशन दुकानदारांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला मंगळवारी रंगेहात पकडले.
रविंद्र सुभाष ठाणगे (पुरवठा निरीक्षक बीड) असे लाच मागणार्या अधिकार्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड तहसीलमधील पुरवठा विभागातील ठाणगे याने रेशन दुकानदाराविरोधात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याच्या बदल्यात रेशन दुकानदारास तब्बल दहा हजाराची लाच मागितली होती. एवढेच नाही तर पैसे दिले नाही तर दुकानाचा परवाना रद्द करेल, अशी धमकी देखील संबंधित रेशन दुकानदाराला दिली होती. संबंधित रेशन दुकानदाराने थेट लाचलूचपत कार्यालय गाठले आणि तेथून मंगळवारी दुपारी तहसील परिसरात लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी सापळा रचला.
स्वतःच्याच कार्यालयात स्वीकारले पैसे-
पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे याने स्वत:च्याच कार्यालयामध्ये संबंधित दुकानदाराकडून दहा हजाराची लाच घेताना एसीबीच्या अधिकार्याने रंगेहात जेरबंद केले. सदरील लाचखोर पुरवठा अधिकारी रविंद्र सुभाष ठाणगे विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागात मोठ्या प्रमाणात लाचखोरी वाढली आहे. ठाणगे च्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडेसह पीआय परदेशी, अमोल बागलाने आदींनी केली.
मोठे मासे गळाला लागणे आवश्यक-
बीड तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी आधी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात नंतरच कामे होतात अशा अनेक तक्रारी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या आहेत ठाणगे यांच्यावरील कारवाईनंतर तहसील कार्यालय आतला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून महसूल विभागातील मोठे मासे गळाला लागणे आवश्यक आहे पुरवठा विभागात बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी देखील यापूर्वी झालेली आहे.