बीड-नीट, जेईई शिक्षणासाठी राजस्थानमधील कोठा येथे बीड जिल्ह्यातील 55 विद्यार्थी लॉकडाऊन मुळे अडकले होते. अखेर मंगळवारी ते विद्यार्थी बीडला सुखरूप परतले आहेत. विद्यार्थी एका खाजगी ट्रॅव्हल्सने बीड मध्ये आले
नीट, जेईई आदी शिक्षणासाठी राज्यातून अनेक विद्यार्थी कोठा येथे गेले होते. यात बीडमधील 55 विद्यार्थ्यांचा समावेश होता.हे सर्वजण लॉकडाऊनमुळे तिथे अ़डकले होते. राज्य शासनाने याची दखल घेवून बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले सुरू केले होते.
राज्य सरकारच्या परवानगी नंतर हे विद्यार्थी मंगळवारी बीड जिल्ह्यात आले. कोठा ( राजस्थान ) येथून हे विद्यार्थी बीड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी 4 . 30 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांना एका खाजगी ट्रॅव्हल्सने बीड बसस्थानकाच्या पाठीमागील ठिकाणी सोडण्यात आले. या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले होते. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कोठा येथे अडकलेले विद्यार्थी परत आल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे