ETV Bharat / state

माध्यमांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांची बदनामी थांबवावी- अ‌ॅड संगीता चव्हाण

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा चव्हाण, वन मंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप संगीता चव्हाण यांनी केला.

पूजा चव्हाण
पूजा चव्हाण
author img

By

Published : Feb 27, 2021, 5:45 PM IST

Updated : Feb 27, 2021, 7:06 PM IST

परळी (बीड)- पूजाचे वडील लहू चव्हाण यांना बीपीचा त्रास आहे. लहान बहीण दहावीला आहे. तीची आई आजारी आहे. अशा स्थितीत याप्रकरणी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत ते योग्य नाही. या प्रकरणात बदनामी थांबली पाहिजे अन्यथा बंजारा समाजाला काहीतरी विचार करावा लागेल, असा इशारा बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अँड संगीता चव्हाण यांनी दिला.

विरोधकांवर हल्लाबोल
संगीता चव्हाण यांनी शुक्रवारी पूजा चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा चव्हाण, वन मंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप संगीता चव्हाण यांनी केला. ही बदनामी सहन केली जाणार नाही. पोलीस तपास चालू असताना विरोधक आरोप करून अडथळा निर्माण करत आहेत. पूजा चव्हाण ही केवळ बंजारा समाजाचीच लेक नव्हे तर राज्याची लेक आहे.

चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ जे बोलत आहेत ते अशोभनीय आहे असे म्हणत संगीता चव्हण यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. तसेच पूजाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तरी विरोधकांकडून तिची बदनामी सुरूच आहे. या सगळ्या बदनामीवरुन पूजाच्या कुटुंबियांना काही झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही संगीता चव्हाण यांनी उपस्थित केला.

Last Updated : Feb 27, 2021, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.