ETV Bharat / state

Beed Crime : बीडमध्ये दोन गटात तुफान दगडफेक; 65 जणांवर गुन्हा दाखल तर 70 जण पोलिसांच्या ताब्यात; घटनेचे कारण आले समोर - Stone pelting in two groups at Kej

बीडमधील केज शहरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेक प्रकरणी 65 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 70 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटात झालेल्या दगडफेकीमुळे केज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर घटनास्थळी दाखल झाले.

Beed Crime
बीडमध्ये दोन गटात तुफान दगडफेक
author img

By

Published : Mar 24, 2023, 4:49 PM IST

पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर माहिती देताना

बीड : जिल्ह्यातील केज शहरात क्षुल्लक कारणावरून दोन गटाने आमने-सामने येत तुफान दगडफेक केली. ही घटना रात्री साडेअकरा ते 12 च्या दरम्यान घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल 70 तरुणांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह पूर्ण टीमने घटनास्थळी दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिला इशारा : सध्या केज शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस यंत्रणा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे शहरात तब्बल 15 अधिकाऱ्यांसह 150 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटातील तब्बल 65 जणांवर भादवि कलम 143,147,148, 149, 153(अ)323, 324, 295, 336, 308, 427, 160, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण : केज शहरामध्ये लोंढे गल्ली परिसरामध्ये 23 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता दोन गटांमध्ये तेढ निर्माण दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारी होऊन भांडण झाली. त्यामध्ये अफवा पसरल्यामुळे त्यातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करून हल्ला केला. यामध्ये नमूद ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमध्ये नागरिक कोणीही फिर्याद देत नसल्यामुळे या घटनेच्या प्राप्त माहितीवरून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन नमूद प्रकरणामध्ये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिस यंत्रणा अलर्ट : दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे परिसरात सध्या शांतता आहे. सतर्क बंदोबस्त नेमण्यात आलेला असून, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सोशल मीडिया, व्हाट्सअप तसेच फेसबुक, यावरही पोलीस यंत्रणेचे कटाक्षाने लक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याचे काम नागरिकांनी करू नये आणि कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील, असे आवाहन पोलीस अधीक्षक बीड यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari News : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; खंडणीसाठी वापरलेले दोन सिमकार्ड जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.