ETV Bharat / state

शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा; शेतकरी संघटनांची मागणी

author img

By

Published : Jan 2, 2021, 10:42 PM IST

बंद केलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असताना शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद आहे. त्याचा आर्थिक फटका गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे.

Government Cotton Procurement Center Beed
शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा

बीड - बंद केलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असताना शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद आहे. त्याचा आर्थिक फटका गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत आता शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.

हेही वाचा - चिंताजनक..! बीडमध्ये मुलींचा जन्मदर घसरला; जनजागृतीत जिल्हा प्रशासन अपयशी

यंदा जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्‍टरच्या जवळपास कापसाची लागवड झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस वाया गेला. उरलेला कापूस खरेदी केंद्रावर आणला जात आहे. परंतु, कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. तात्काळ शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या शेवटच्या बोंडाचा कापूस शिल्लक असे पर्यंत खरेदी केली जावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकरी संघटनांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली आहे. जर शेतकऱ्यांच्या कापसाची मापे झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

हेही वाचा - 'बोली'वाल्या सरपंचांना अण्णा हजारेंच्या कानपिचक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.