बीड- औरंगाबाद-मुखेड या एसटी बसची व जीपची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 3 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील चंदन सावरगाव जवळ घडली. या घटनेत 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून मुखेडकडे निघालेली एसटी बस क्र.(एम.एच.२० बी.एल.३७२१) या बसचा आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात तिहेरी असल्याचा सांगण्यात येते. यामध्ये बसमधील विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख (वय ५५ वर्षे, रा.मोहखेड ता. मुखेड), अनिल मोतीलाल कवलकर (वय ५० वर्षे, रा.उमरगा) आणि शाम वसंत राजगीरवाड (वय ३७ वर्षे, रा.चेरा, ता. जळकोट) हे तिघे जागीच ठार झाले.
अपघातात १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे -
बालाजी मारोती घोडगे(वय ५० वर्षे,रा.जांब, ता.मुखेड), दत्ता रघुनाथ मोरे(वय ३५ वर्षे, रा. लातूर), विकास दास (वय ४० वर्षे, रा.कलकत्ता), डॉ. विष्णुपंत गायकवाड ( वय ३० वर्षे, रा.हाळी हरंगूळ), डॉ. संतोष ज्ञानोबा गुणाले (वय ३० वर्षे, रा. उदगीर), शीतल सुनील मायकर (वय २५ वर्षे),अशोक बबन जाधव (वय ४० वर्षे, रा.खडकवडे), अल्फीया अझर सिद्दीकी (वय २१ वर्षे, रा.अंबाजोगाई), शिवनाथ गायकवाड (वय ३५ वर्षे, रा.गेवराई), मीना अशोक जाधव (वय ४० वर्षे, रा. पाटोदा), सरुबाई राजगीरवाड ( वय ६० वर्षे, रा.चेरा ता.जळकोट, जि.लातूर) आणि बसचा वाहक देवानंद दत्तात्रय शिंदे (वय ४५ वर्षे, रा.गुंटूर, नांदेड)