बीड : बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यामध्ये अनेक संत महंत होऊन गेले आहेत. अनेक देवी देवतांचे मंदिरं देखील याच जिल्ह्यात आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग बीडच्या परळी वैद्यनाथ या ठिकाणी आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अजुन काही खुणा सांगून जात आहे, त्यातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा हे गाव एक अनोख गाव म्हणून ओळखलं जातं. या गावांमध्ये तांबेश्वराचे श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिराची एक अख्यायिका आहे की, या गावाच्या परिसरामध्ये शिवारामध्ये कडुनिंबाचे झाड कुठेही उगवत नाही आणि जरी उगवले तरी ते जास्त दिवस टिकत नाही. काही लोकांच्या नजरेस पडल्यानंतर ते झाड जळून जाते त्यामुळे गेली अनेक पिढ्यांपासून या गावाच्या शिवारामध्ये कडू लिंबाचे झाड उगवत नाही, असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अनादी काळापासूनची परंपरा : या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी शंभू महादेवाची स्वयंभू मूर्ती असल्यामुळं व प्रत्यक्षात शंभू महादेव या ठिकाणी असल्यामुळं अनादी काळापासून हे पुरातन मंदिर आहे. या परिसरात जर कोणत्याही व्यक्तीला सर्पदंश झालाच तर तो व्यक्ती या ठिकाणी आणला जातो. त्याचा सर्पदंश उतरवला जातो, आणि विशेष म्हणजे सर्पदंश उतरवण्यासाठी कडुनिंबाचा पाल्याचा वापर केला जातो अशी प्रथा आहे. वैज्ञानिक कसोटीवर ही मते टिकत नसली तरी लोकांना मात्र यात तथ्य वाटते. लोकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी स्वयंभू मूर्ती असल्यानं या ठिकाणी कडुनिंबाचे झाड उगवत नाही आणि जरी उगवलं तरी ते काही दिवसात आपोआप जळून जाते त्यामुळे हि अनादी काळापासूनची ही परंपरा आजही चालूच आहे. आणि या ठिकाणी नाग उतरवण्यासाठी दुसऱ्या गावातील व्यक्ती चालत नाही आणि जरी आला तरी तो नाग उतरत नाही. या ठिकाणी स्वयंभू महादेवाच्या वास असल्यामुळे या ठिकाणी लिंबाचे झाड ही उगवत नाही आणि सर्पदंश झालेली व्यक्ती मरणही पावत नाही किंवा त्याला धोका होत नाही त्यामुळे ही अनादी काळापासूनची परंपरा आजही चालूच आहे.
'या' प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे : "कोणत्याही गावात असलेली अंधश्रद्धा ही कुठल्याही क्षेत्रात असो ती आपल्याला बाधक असते, अशा रूढी परंपरा जर अशा चालू राहिला तर ह्या येणाऱ्या पिढ्यांसाठी बाधक राहू शकतात, याच्यावर गावकऱ्यांनी आणि सर्वांनीच काहीतरी उत्तर शोधले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अनेक रूढी परंपरा आजही पाहायला मिळत आहेत. केज तालुक्यातील तांबवा या गावांमध्ये शिक्षणाचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी सुशिक्षित असून या ठिकाणी नोकरदार वर्गांची संख्याही चांगली आहे, मोठे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जी रूढी परंपरा आहे, यामध्ये तीन प्रकार असू शकतात लिंबाच्या झाडामुळे गावातील एखाद्या व्यक्तीला बाधा झालेली असेल किंवा ते झाड एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडलेला असेल यामुळे या परिसरात हे झाड येऊ दिल जात नाही अशीही रूढी परंपरा असू शकते. त्या ठिकाणच्या मातीमध्ये काही घटक आहेत का की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड येत नाही, याच गावातील नागरिकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे, हा काही चमत्कार आहे का हे त्या नागरिकांनी दाखवून दिलं पाहिजे", असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य हनुमंत भोसले म्हणाले.
हेही वाचा :