ETV Bharat / state

बीडमध्ये एका तालुक्‍यात केवळ २५ छावण्यांना मंजुरी; चारा टंचाईमुळे पशुमालकांची हेळसांड

बीडमध्ये दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच तालुक्यात चारा छावण्यांना मंजुरी दिल्यामुळे इतर १० तालुक्यातील पशू मालक चिंतेत आहेत.

चारा टंचाईमुळे जनावरांचे होणारे हाल
author img

By

Published : Mar 2, 2019, 11:32 AM IST

Updated : Mar 2, 2019, 12:54 PM IST

बीड - दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच तालुक्यात २५ छावण्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या ८ लाख तर शेळ्या-मेंढ्या ३ लाख, अशी आहे. मंजूर छावण्या या आष्टी तालुक्यातील असून इतर १० तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळपर्यंत छावण्या मंजूर झालेल्या नाहीत.

चारा टंचाईमुळे जनावरांचे होणारे हाल

दुष्काळाच्या अनुषंगाने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू कराव्यात, असे आदेश यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र अत्यंत धीम्या गतीने दुष्काळ निवारणाची कामे होत आहेत. आतापर्यंत केवळ २५ छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे. या मंजूर छावण्या केवळ आष्टी तालुक्यातीच असून इतर १० तालुक्यात अद्याप एकाही छावणीला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे पशू मालक चिंतेत आहेत. यामुळे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बीड तालुक्यातील पशुमालक बाबुराव काळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. इतर तालुक्यांमध्ये छावण्या सुरू केल्या तर पशु मालकांना आधार मिळेल आणि दुग्ध व्यवसाय टिकून राहिल. आज घडीला जिल्ह्यातील शेतीची कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जनावराला चारा आणि मजुरांच्या हाताला काम देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच छावण्या मंजुरीमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Intro:आतापर्यंत एकाच तालुक्‍यात केवळ 25 छावण्यांना मंजुरी; चारा टंचाई मुळे पशुमालकांची हेळसांड

बीड- सातत्याने जिल्ह्यात दुष्काळ असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकाच तालुक्यात 25 छावण्याला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या आठ लाख तर शेळ्या-मेंढ्या तीन लाख अशी आहे. मंजूर छावण्या या आष्टी तालुक्यातील असून बीड जिल्ह्यातील इतर इतर 10 तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत छावण्या मंजूर झालेल्या नाहीत.

Body:बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू कराव्यात असे आदेश यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र अत्यंत धीम्या गतीने दुष्काळ निवारणाची कामे होत आहेत. आतापर्यंत केवळ 25 छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे. आहे तेही ही मंजूर छावण्या केवळ आष्टी तालुक्यातील असून बीड जिल्ह्यातील इतर 11 तालुक्यात उद्यापर्यंत एकही छावणीला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे पशु मालक चिंतेत आहेत याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बीड तालुक्यातील पशुमालक बाबुराव काळे यांनी सांगितले.

Conclusion:बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने दुग्ध व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. जर बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये छावण्या सुरू केल्या तर पशु मालकांना आधार मिळेल व दुग्ध व्यवसाय टिकून राहील. आज घडीला बीड जिल्ह्यातील शेतीची कामे देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जनावराला चाहा व मजुरांच्या हाताला काम देण्याचे चे आवाहन जिल्हा प्रशासना समोर आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एवढेच नाही तर छावण्या मंजुरी मध्ये हे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Last Updated : Mar 2, 2019, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.