बीड:जमिनीच्या वादातून सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिष्ट्री कार्यांलयात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली तर फारुख सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेल्या मुळे हे दोघे जखमी झाले. दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात गोळीबार करणारे कोण होते, कोणत्या जमिनीचा वाद होता. याबाबत तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात गोळीबार केलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच सगळा प्रकार समोर येणार आहे.
हेही वाचा : आमगाव पोलिसांच्या कोठडीतून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार