ETV Bharat / state

बीडमध्ये युतीला धक्का, शिवसंग्रामचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा - पाठिंबा

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणार आहे. शिवसंग्राम बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही. तर शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय सोनवणे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

बीडमध्ये युतीला धक्का, शिवसंग्रामचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा
author img

By

Published : Apr 11, 2019, 8:11 PM IST

बीड - बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसंग्रामने भाजपला मदत केली. मात्र, बीड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात आम्हाला संपवण्याचा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणार आहे. शिवसंग्राम बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही. तर शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय सोनवणे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी मेटे म्हणाले, बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दाबण्याचा प्रयत्न झाला. आम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करत असतानादेखील पालकमंत्र्यांनी वेळोवेळी आमच्या विरोधात भूमिका घेतली. असे असतानाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला व पंकजा मुंडे यांना सहकार्य केलेले आहे. मदत करूनदेखील आम्हाला निधी मिळू न देण्याचे पाप पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले असल्याचा आरोप यावेळी मेटेंनी केला.

बीडमध्ये युतीला धक्का, शिवसंग्रामचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

पंकजा मुंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझे काम केले असते. तर, मी आज बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतो. मात्र, त्यावेळी भाजपच्या याच जिल्हाध्यक्षांनी व पंकजा मुंडेनी माझ्याशी गद्दारी केली, असेही मेटे यावेळी म्हणाले.

यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात बजरंग बली की जय, अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी शिवसंग्राम असल्याचे स्पस्ट केले. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलांगडे , जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, सुहास पाटील, मनोज जाधव, गणेश बजगुडे, ज्ञानेश्वर कोकाटे , सुभाष सपकाळ नितीन लोढा, अनिल घुमरे, लक्ष्मण ढवळे, सुदर्शन धांडे, दत्ता जाधव, कैलास माने, राजेंद्र आमटे, आनंद जाधव आदींची उपस्थिती होती.

Intro:बीड लोकसभा: शिवसंग्राम चे मिळाल्यात बजरंग बली की जय अशा घोषणा; आ. विनायक मेटे यांनी दिला बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

बीड- पाच वर्ष आम्ही भाजप बरोबर घटक पक्ष म्हणून राहिलो. बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसंग्राम ने तुम्हाला मदत केली. मात्र बीड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात आम्हाला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. आता लोकसभा निवडणुकी मध्ये शिवसंग्राम प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणार आहे. आम्ही बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करणार नाही. तर शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या पाठीशी बीडची शिवसंग्राम उभी राहील. अशी भूमिका शिवसंग्राम चे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी घेतली. यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी 'बजरंग बली की जय' अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी शिवसंग्राम ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.

Body:बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंग्राम भूमिका आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी स्पष्ट केली. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलांगडे , जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, सुहास पाटील, मनोज जाधव, गणेश बजगुडे, ज्ञानेश्वर कोकाटे , सुभाष सपकाळ नितीन लोढा, अनिल घुमरे, लक्ष्मण ढवळे, सुदर्शन धांडे, दत्ता जाधव, कैलास माने, राजेंद्र आमटे, आनंद जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार विनायक मेटे म्हणाले की, सातत्याने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना बीड जिल्ह्यात दाबण्याचा प्रयत्न झाला. आम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करत असताना देखील पालकमंत्र्यांनी वेळोवेळी आमच्या विरोधातली भूमिका घेतली. असे असतानाही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला व पंकजा मुंडे यांना सहकार्य केलेले आहे. आम्ही मदत करून देखील आम्हाला निधी मिळू न देण्याचे पाप पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले असल्याचा आरोप करत आमदार मेटे पुढे म्हणाले की जर 2014 च्या लोक विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते पंकजा मुंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या माझे काम केले असते तर मी आज बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिसलो असतो मात्र तेव्हा याच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी व पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्याशी गद्दारी केली. याची खंत देखील यावेळी आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

Conclusion:शिवसंग्रामचे आज पर्यंत प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची भूमिका घेतलेली आहे. ना गोपीनाथ मुंडे यांना हरवण्यासाठी बीड जिल्ह्यातील सगळे नेते ते एकत्र आले होते. तेव्हा याच शिवसंग्राम ने व मी गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. तेव्हाही आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढून बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना सहकार्य केले. आज देखील आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका घेऊन शेतकरी पुत्राला मदत करणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात बजरंग बली की जय अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी शिवसंग्राम असल्याचे स्पस्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.