बीड: बीड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनावर एक नाही, तर अनेक आरोप होत असतानाच बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे सध्या गेल्या महिन्याभरापासून चांगले चर्चेत आलं होतं. या ठिकाणी अनेक गुन्हे सेटलमेंट केले जातात, पैसे घेऊन गुन्हेगारांना सोडले देखील जात, अशाही अनेक कुजबूज नागरिकात पाहायला मिळत होते. beed city police मात्र काल घडलेल्या औरंगाबाद एसीबीने केलेल्या कारवाईत बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसांचा चेहरा समोर आला आहे.
जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ: सोमवारी सायंकाळच्या वेळी ठाण्यातील 2 लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईत समोर आला आहे. 15 हजार रुपयाची लाच घेताना औरंगाबाद एसीबीने एका पीएसआय सह एका पोलीस कर्मचाऱ्याला पकडले आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हे प्रकरण समोर येताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्या दोन्ही लाचखोर पोलिसांना तडका फडकी निलंबित केले आहे.
विनयभंगाचा गुन्हा: राजू भानुदास गायकवाड वय 53 पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड आणि विकास सर्जेराव यमगर वय 32 वर्ष पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड असे लाच घेणाऱ्या पोलिसांच नाव आहे. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांना विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीत 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दोघांना रंग हात पकडले: यापैकी 10 हजार रुपये यापूर्वी घेतलेली आहेत, तर उर्वरित 15 हजाराची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. औरंगाबादच्या एसीबीने ही कारवाई बीड शहरातील बस स्थानकासमोरील ओळखी हॉटेलला केली आहे. ही कारवाई एसीबीने पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गोरखनाथ गांगुर्डे त्यांनी ही कारवाई केली आहे.
तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती दिली: याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही त्या दोन्ही लाचखोर पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईआधी नुकतीच राजू गायकवाड यांना मिळाली होती. पदोन्नती मागच्या 15 दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती दिली होती. यावेळी राजू भानुदास गायकवाड यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पदोन्नती मिळूनही ते लाचेचा मोहासाठी त्यांनी केलेल्या या कृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.