ETV Bharat / state

Beed Crime : लुटमार झाल्याचे सांगून मालकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या नोकराला अटक - नोकराची लुटारुंशी संगनम

लुटारूशी संगनमत (Servant connivance with robbers) करून मालकाला लाखो रुपयांचा गंडा (duping owner of lakhs of rupees) घालणाऱ्या नोकराला बीड पोलिसांनी तब्बल सात महिन्यानंतर अटक (Servant arrested in Robbery Case) केली आहे. व्यापाऱ्यांकडून पैशाची वसूली करून परतत असलेल्या फिर्यादी नोकराला कारमधून आलेल्या लुटारूने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे (robbery at knifepoint) पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा संगनमताने झाल्याचे कळले. पोलिसांनी फिर्यादीसह अन्य एका आरोपीली ताब्यात घेऊन सक्तीने विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची (Planned Robbery Exposed In Beed) कबूली दिली.

Planned Robbery Exposed In Beed
आरोपींना अटक
author img

By

Published : Jan 11, 2023, 1:57 PM IST

बीड : नोकर हा मालकाकडे अनेक वर्षांपासून कामाला होता. त्यामुळे मालकाचा त्याच्यावर विश्वास होता. दरम्यान व्यापाऱ्यांकडून पैसे आणण्याचे काम फिर्यादी नोकराला देण्यात आले होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी नोकराने स्वत:च्याच लुटमारीचा बेत आखला. (Servant arrested in Robbery Case) त्यानुसार (Servant connivance with robbers) आपल्याला लुटारूनी रस्त्यात अडवून पैसे हिसकावून पळ काढल्याचे नोकराने (robbery at knifepoint) सांगितले होते. ज्यावर मालकाचा विश्वासही बसला. या प्रकरणात फिर्यादी नोकराने पोलिसांकडे तक्रारही केली होती. हा सर्व प्रकार गुप्तहेराच्या माहितीच्या आधारे बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस (Planned Robbery Exposed In Beed) आणला.

काय होता घटनाक्रम? बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगांवहून वसूली करून परतत असलेल्या नोकराला अडवून लुटारूंनी पैसे लुटल्याचा बनाव नोकराने केला. लुटीचा आकडा ३ लाख ११ हजार असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम मालकाची असल्याने नोकरानेच पोलिसांकडे घटनेची तक्रार केली. ११ जुलै २०२२ रोजी धामणगांव शिवारात फिर्यादी आदेश गौतम बोखारे हे व्यापाऱ्यांकडून वसूल केलेले पैसे घेऊन धामणगांव येथून परतत होते. यावेळी मागून कारने आलेल्या दोन लुटारूंनी फिर्यादीस अडवून चाकूचा धाक दाखवत फिर्यादी जवळील 3 लाख ११ हजार रुपये असलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून नेली होती. त्यावरून अंभोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

रकमेची वाटणी करण्याचा होता बेत : या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हा शाखेचे पो. नि. वाघ यांना गोपनीय सुत्रांमार्फत बातमी मिळाली की, लुटमारीचा हा गुन्हा नोकर गौतम बोखारे (फिर्यादी), महेश त्रिंबक करडुळे (रा.धिर्डी) यांच्या संगनमताने करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी दोन संशयितांनी ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस सुरू केली. पोलिसी हिसका दाखवतातच दोघांनीही संगनमताने लुटमारीचा प्लान आखल्याची कबुली दिली. फिर्यादी गौतम बोखारे यानेच व्यापाऱ्याचे पैसे लुटण्याचा प्लान केला होता आणि लुटलेल्या मालाची अर्धी-अर्धी रक्कम वाटून घेण्याचे ठरले होते. आरोपीकडून मिळालेल्या रक्कमेचा पंचनामा करण्यात आला असून वरील दोन्ही आरोपी व मुद्देमाल अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पोलिसांनी लावला छडा : आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास अंभोरा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सतिश वाघ, पोलीस उप निरीक्षक दुलत, सफौ शेख सलीम, पोलीस हवालदार मनोज वाघ, पोलीस हवालदार रामदास तांदळे, पोलीस हवालदार प्रसाद कदम, पोलीस नायक विकास वाघमारे, पोलीस नायक सोमनाथ गायकवाड, पोलीस शिपाई विकी सुरवसे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांनी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.