ETV Bharat / state

संदीप क्षीरसागर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप रवींद्र क्षीरसागर हे शुक्रवार (दि.4 ऑक्टोबर) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संदीप रवींद्र क्षीरसागर
author img

By

Published : Oct 2, 2019, 9:02 AM IST

बीड - बीड विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत होत आहे. येथे चुलते विरुद्ध पुतण्या, अशी लढत रंगणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप रवींद्र क्षीरसागर हे शुक्रवार (दि.4 ऑक्टोबर) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी 10 वाजता रॅलीस सुरुवात होणार असून बागलाने इस्टेट येथे दुपारी 3 वा. जाहीर सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व मित्र पक्षाचे सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, पालिकेचे गटनेते फारूक पटेल, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर यांनी केले आहे.

हेही वाचा - नियती कोणाला माफ करत नसते; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महिनाभरापूर्वीच संदीप क्षीरसागर यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. संदीप क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत शहरातील घरोघरी जात, ग्रामीण भागात वाडी-वस्ती तांड्यावर पोहचत जनसामान्यांकडे मतदानरुपी आशीर्वाद मागितले. बीडमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून पाहिजे तसा विकास झाला नसल्याने परिवर्तन घडविण्यासाठी आणि बीडचा विकास करण्यासाठी ‘बीडकरांना बदल हवा, संदीप भैय्या पर्याय नवा’ हा संदेश घेऊन राष्ट्रवादी घरा-घरात पोहचली आहे.

हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे

4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून संदीप क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीस सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून माळीवेस-बलभिम चौक-कारंजा रोड, छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तहसीलमार्गे माने कॉम्प्लेक्स पुढे बागलाने इस्टेट येथे जाहीर सभेत रूपांतरीत होणार आहे.

Intro:संदिप क्षीरसागर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

बीड- बीड विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत होत आहे. चुलते विरुद्ध पुतण्या अशी लढत आहे बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदिप रविंद्र क्षीरसागर हे शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 10 वा. रॅलीस सुरूवात होणार असून बागलाने इस्टेट येथे दुपारी 3 वा. जाहीर सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व मित्र पक्षाचे सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, पालिकेचे गटनेते फारुक पटेल, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांनी बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महिनाभरापूर्वीच संदिप क्षीरसागर यांना तय्यारीला लागण्याचे आदेश दिले होते. संदिप क्षीरसागर यांनी सहकार्यांना सोबत घेत शहरातील घरोघरी जात ग्रामिण भागात वाडी-वस्ती तांड्यावर पोहचत जनसामान्यांकडे मतदानरुपी आशिर्वाद मागितले. बीडमध्ये गेल्या पंचेवीस वर्षापासून पाहिजेत तसा विकास झाला नसल्याने परिवर्तन घडविण्यासाठी आणि बीडचा विकास करण्यासाठी ‘बीडकरांना बदल हवा, संदिप भैय्या पर्याय नवा’ हा संदेश घेवून राष्ट्रवादी घरा-घरात पोहचली आहे. दि.4 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाकडून संदिप क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीस सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून माळीवेस-बलभिम चौक-कारंजा रोड-छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तहसिल मार्गेे माने कॉम्प्लेक्स पुढे बागलाने इस्टेट येथे जाहीर सभेत रुपांतरीत होणार आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंंडळी, प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी संदिप क्षीरसागर यांना आशिर्वाद देण्यासाठी रॅलीस व सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, पालिकेचे गटनेते फारुक पटेल, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, कपील इनकर यांच्यासह आदींनी केली आहे.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.