ETV Bharat / state

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई, आशिर्वाद देण्याचे संदीप क्षीरसागरांचे आवाहन

बीड विधानसभा मतदारसंघातील लढत ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. मी व माझे कार्यकर्ते कायम जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर असतो. जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून आशिर्वाद द्यावेत, अशी साद संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित जनतेला घातली.

संदीप क्षीरसागर
author img

By

Published : Oct 5, 2019, 10:01 AM IST

बीड - विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रंगतदार लढती होत आहेत. यामध्येच बीड विधानसभा मतदारसंघातील काका - पुतण्यात होत असलेली लढत चर्चेचा विषय ठरत आहे. शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बीड विधानसभा मतदारसंघातील लढत ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. मी व माझे कार्यकर्ते कायम जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर असतो. ज्या माझ्या काकाने माझ्यावर अन्याय केला त्यांच्या विरोधात मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे. जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून आशिर्वाद द्यावेत, अशी साद संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित जनतेला घातली.

संदीप क्षीरसागरांचा जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा

बीड शहराची झालेली अवस्था जनता पाहत आहे. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. 2012 मधली कामे 2017 मध्ये झाली. आम्ही शहराचे राखणदार म्हणून काम करत आहोत. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना लोकांचे हित आम्ही पाहिले. आमच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले, मात्र, एकही आरोप तुम्ही सिध्द करु शकला नसल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. तुमच्याकडे बोलायला काही नसल्यामुळे तुम्ही चारित्र्यावर येता. यापुढे जर चारित्र्याची भाषा कराल तर पत्रकारांच्या परवानगीने आमने-सामने बसू तुमच्या चारित्र्याच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. तेही पुराव्यानिशी. कोणत्याही प्रयोगशाळेत पाठवा खोटे निघाले तर माघार घेईल असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

Intro:जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई- संदीप क्षीरसागर

बीड- बीड विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत आहे. मी व माझे कार्यकर्ते कायम जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर असतो , ज्या माझ्या काकाने माझ्यावर अन्याय केला त्यांच्या विरोधात मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे. जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्यावेत अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संदीप शिरसागर यांनी उपस्थित जनतेला घातली आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमदेवार संदिप क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भव्य प्रचंड रॅलीचे बागलाने इस्टेट येथे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी व्यासपीठावर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.जनार्धन तुपे, अ‍ॅड.डी.बी.बागल, रविंद्र क्षीरसागर, बाबुसेठ लोढा यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना संदिप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराची काय अवस्था झाली आहे, ही जनता पाहत आहे. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. 2012 मधली कामे 2017 मध्ये झाली. आम्ह शहराचे राखणदार म्हणून काम करत आहोत पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये काम करत असतांना लोकांचे हित पाहिले आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करता. एक आरोपही तुम्ही सिध्द करु शकला नाहीत. तुमच्याकडे बोलायला काही नसल्यामुळे तुम्ही चारित्र्यावर येता यापुढे जर चारित्र्याची भाषा कराल तर पत्रकारांच्या परवानगीने आमने-सामने बसू तुमच्या चारित्र्याच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. तेही पुराव्यानिशी कोणत्याही प्रयोगशाळेत पाठवा खोटे निघाले तर माघार घेईल. मायबाप जनतेनं मतदानरुपी आशिर्वाद द्यावा, आयुष्यभर उपकार विसरणार नाही. असे आवाहन संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केले...Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.