ETV Bharat / state

Sahitya Sammelan अंबाजोगाईत शुक्रवार पासून साहित्य संमेलन, भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी - Dasu Vaidya

शुक्रवार १९ ऑगस्ट पासुन तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे Sahitya Sammelan In Ambajogai from Friday आयोजन करण्यात आले आहे Ambajogai Literature festival. या संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकर Non Resident Ambajogaikar साहित्य कलेचा जागर करणार आहेत will conduct literature and art fair विविघ ९ सत्रांच्या आयोजनासोबतच जागर दिंडी, कला व ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, पुरस्कार वितरण, कवी, कथा संमेलन विविध गुण दर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहेत.

Ambajogai Literature Conference
अंबाजोगाई साहित्य संमेलन
author img

By

Published : Aug 18, 2022, 5:28 PM IST

अंबाजोगाई: तीन दिवसीय साहित्य संमेलन येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Girwalkar Engineering College) चित्रकार दिलीप बडे (Chitrkar Dilip Bade) साहित्य नगरीतील सुर्यकांत गरुड विचारपीठावर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी ३ वाजता जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जागर दिंडीची सुरवात ज्येष्ठ नागरिक सौ. कमल बरुरे आणि एस.बी. सैय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जागर दिंडी रमाई आंबेडकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, मोरेवाडी मार्गे अभियांत्रिकी महाविद्यालयात पोचणार आहे. या दिंडीचे संयोजन डॉ. उध्दव शिंदे हे करणार आहेत.

चित्र आणि ग्रंथ प्रदर्शन: परीसरात प्रा. दिलीप बडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्या डॉ. अखिला गौस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. राहुल धाकडे आहेत. संमेलनाचा उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. दासू वैद्य (Dasu Vaidya) तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे (Dilip Ghare) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, स्वागताध्यक्ष डॉ. बी. आय. खडकभावी, मसाप चे अध्यक्ष दगडु लोमटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, लेखक अमर हबीब यांना नंदा देशमुख स्मृती कथालेखक पुरस्कार, प्रा.डॉ. अलका वालचाळे यांना प्रा. शैला लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावकर स्मृती शिक्षक लेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात येणार आहे.

कथाकथनाने पहिल्या सत्राची सुरुवात : १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता या साहित्य संमेलनातील कथाकथन या पहिल्या सत्रास सुरुवात होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक गोरख शेंद्रे हे राहणार असून या सत्रात हरीश कस्पटे यांचा सहभाग असणार आहे. या सत्राचे संयोजक अर्चना स्वामी या राहणार आहेत. सायंकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रात अनिवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष कुलकर्णी असणार आहेत. तर सहभागी कवीमध्ये अलीम अजीम, डॉ. सिद्धोधन कांबळे बलराज संघई अनुपमा मोटेगावकर रचना स्वामी अविनाश भारती अस्मिता जोगदंड चांदणे उषा भालेराव प्रज्ञा आपेगावकर रत्नदीप शिंदे सत्र संयोजक प्रा. विष्णू कावळे यांचा सहभाग असणार आहे.

निवासी कवी संमेलन : या नंतर होणाऱ्या सत्रात निवासी कवी संमेलन होणार असुन त्याच्या अध्यक्षस्थानी गणपत व्यास असणार आहेत. यात निशा चौसाळकर, अतहर हुसैन, संध्या सोळंके-शिंदे, रविंद्र पांडे, अर्चना मुंदडा, तिलोत्तमा इंगोले, राजेश रेवले, अंजली भंडारी, अत्तम राठोड, रमेश मोटे, राज पठाण, गोविंद हाके, डॉ. राजेश्वर कुकुंदा यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका रेखा देशमुख असणार आहेत.

संमेलनाध्यक्षांचे साहित्य : संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तिसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्षांचे साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बालाजी सुतार राहणार असून कृष्णा किंबहुने हे दासू वैद्य यांचे मराठी साहित्यातील स्थान या विषयावर तर डॉ. दिपक गरुड हे दृकश्राव्य साहित्य तर गोपाळ तिवारी हे गद्यलेखन या विषयावर व्यक्त होणार आहेत. या सत्राचे संयोजन प्रा. डॉ. देविदास खोडेवाडहे करणार आहेत.

अंबाजोगाई चे अनिवासी पत्रकार : दुपारी १२ वाजता अंबाजोगाई चे अनिवासी पत्रकार या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सचिन काटे राहणार आहेत. यात इतर शहरांच्या तुलनेत अंबाजोगाई या विषयावर ज्येष्ठ पत्रकार गोविंद शेळके तर, स्थलांतर या विषयावर ज्येष्ठ पत्रकार कलीम अजीम तर अंबाजोगाईची बाहेर पोहोचलेली माणसे या विषयावर नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे आपली मनोगते व्यक्त करणार आहेत. या सत्राचे संयोजक अमर हबीब हे आहेत.

अंबाजोगाईच्या माहेरवाशीण : दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या सत्रात अंबाजोगाईच्या माहेरवाशीणया परीसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी शकुंतला लोमटे कवडे या राहणार असून प्रा मुमताज देशपांडे श्रद्धा बेलसरे खारकर न्या कविता बिसेन सोलापूर यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका ज्योती शिंदे या असणार आहेत. सायं ५ वाजता मुलाखती या ६ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात डॉ. तात्याराव लहाने, मुंबई संतोष तावरे प्रकाश महाजन भास्कर चंदनशीव आदींच्या मुक्त मुलिखती होणार आहेत या सत्राचे संयोजन अमृत महाजन हे करणार आहेत.

त्या तिथे पलिकडे : रात्री ७ वाजता त्या तिथे पलिकडे या विषयावरील ७ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्रात अनिवासी अंबाजोगाईकरांचे विविध कला गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. या सत्राचे संयोजन संतोष मोहिते हे करणार आहेत. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ सकाळी १० वाजता मनोगते या ८व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व स्वागताध्यक्ष डॉ. बी. आय. खडकभावी हे राहणार असून या सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात अनिवासी अंबाजोगाईकरांना उत्स्फूर्त मनोगते व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या सत्राचे संयोजक दगडू लोमटे हे असणार आहेत.

माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा : दुपारी १२ वाजता माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा या विषयावरील ९ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर हे या राहणार असून या सत्रात डॉ. माधव किन्हाळकर, रमेश गंगणे, ऍड. विशाल जोगदंड यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका प्रा. डॉ. शैलजा बरुरे या असणार आहेत.

समारोपीय सत्र : दुपारी २ वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दासू वैद्य तर मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर या राहणार आहेत. या कार्यक्रमात पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी व अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे वाहक अमर हबीब यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय संमेलना निमित्ताने घेण्यात आलेल्यानिबंध स्पर्धाचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे हे संकल्प जाहीर करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.