ETV Bharat / state

ऊसतोड मजुरांच्या जिल्ह्यातील 'सचिन'ची भारतीय क्रिकेट संघात निवड, युएईमध्ये करणार भारतीय संघाचं प्रतिनिधीत्त्व - सचिन तेंडुलकर

Beed Cricketer Selected in Team India : भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात बीडच्या सचिन धसची निवड झालीय. यामुळं त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि मित्र परिवार आनंदीत असून सचिनंन भारतीय संघाचं प्रतिनिधीत्त्व करावं अशी अपेक्षा व्यक्त केलीय.

Beed Cricketer Selected in Team India
Beed Cricketer Selected in Team India
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 3:16 PM IST

बीडच्या 'सचिन'ची भारतीय क्रिकेट संघात निवड

बीड Beed Cricketer Selected in Team India : बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. हा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी हा जिल्हा खेळाडूंचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्याचं नाव देशाच्या शिखरावर घेऊन जाणारे अनेक खेळाडू याच बीड जिल्ह्यानं या महाराष्ट्रासह देशाला दिलेले आहेत. अशातच आता बीडच्या सचिन धसची भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात निवड झालीय. यामुळं क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा सचिन हे नाव ऐकायला मिळणार आहे.

सचिननं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्त्व करावं : सचिनची अंडर 19 क्रिकेट संघामध्ये निवड झालीय. सचिनचे कोच अजर यांच्यासह बीड क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर बीसीसीआयचे मी आभार मानते. सचिनला मी पुढील कामासाठी शुभेच्छा देते आणि सचिन एक चांगला खेळाडू म्हणून भारतीय संघात जावं त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करावे अशी माझी इच्छा आहे, असं सचिनच्या आईनं म्हटलंय. मी व माझे पती दोन्हीही खेळाडू असल्यामुळं आम्हाला आमच्या मुलाला खेळाडू बनवायचे होतं आणि लहानपणापासूनच त्याच्यामध्ये ते गुण अवगत झालं वयाच्या चार वर्षापासून तो क्रिकेटची आवड त्याला लागली आणि लहानपणापासूनच त्या आवडीमुळे तो अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू लागला. त्यामुळे त्याचे अनेक क्रिकेटचे खेळ यशस्वी झाल्याचं त्याच्या आईनं सांगितलं.

सचिन तेंडूलकर आवडतो म्हणून मुलाचं नाव सचिन : सचिनचे वडील म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघात सचिनची निवड झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी त्याला शिकवलं ते त्याचे प्रशिक्षक सय्यद अझर, बीड क्रिकेट संघाचे अध्यक्ष भारत भूषण क्षिरसागर या सर्वांनी सचिनला सहकार्य केलंय. विशेष म्हणजे मी एक खेळाडू असल्यामुळं मला सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर हे खूप आवडायचे. त्यामुळं आम्ही पती-पत्नींनी ठरवलं की आपल्याला होणारा मुलगा त्याचं नाव आपण सचिन ठेवू आणि मुलगा झाल्यानंतर सचिन नाव ठेवलं असं सचिनच्या वडिलांनी सांगितलंय. वयाच्या चार वर्षांपासूनच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि तो आज क्रिकेट संघामध्ये निवड झाल्यामुळं मला अत्यंत आनंद होत आहे, असंही सचिनचे वडील म्हणाले.

प्रतिकूल परिस्थितीतही चांगला खेळ : सचिनच्या निवडीबद्दल त्याचे प्रशिक्षक सय्यद अझर म्हणाले की, मला खूप आनंद होत आहे की, मी प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्याची आज भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड झाली. अनेक वेळा अनेक अडचणींचा सामना करुन सचिन खेळत असायचा कधीही त्यानं आळस बाळगला नाही. अनेक वेळा खेळात अडचणी आल्या. बीड सारख्या ठिकाणी जे क्रीडांगण आहे, त्या ठिकाणी सुविधा नाहीत. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यामुळं या ठिकाणचे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र खेळायला अडचणी येत असल्याचं प्रशिक्षक सय्यद अझर म्हणाले.

सर्वांच्या मेहनतीचं फळ : भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यामुळं आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. सचिननं भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करावं आणि येणाऱ्या काळात बीडचं नाव देशाच्या नकाशावर करावं अशीच आमची अपेक्षा आहे. सर्वांच्या मेहनतीला आज फळ आलंय. त्यामुळं आम्हाला खूप त्याचा आनंद होत असल्याचं मित्र अशोक जाधव यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. युवा रिंकू सिंगकडे भारतीय संघ फिनिशर म्हणून पाहतोय, माजी यष्टिरक्षक साबा करीम यांचे मत
  2. T20 विश्वचषकासाठी 20 संघ भिडणार; पुढील वर्षी होणार स्पर्धा, कशा पद्धतीनं होणार विश्वचषक ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.