बीड - विहिरीतून पिण्यासाठी हंडाभर पाणी घेतले म्हणून एकावर टॉमीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे घडली आहे. या घटनेत एक युवक गंभीर जखमी तर २ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. मोहन त्र्यंबक नाटकर, वृंदावनी मोहन नाटकर आणि नानीबाई इंद्रराव नाटकर, असी त्यांची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे रुस्तम शिवाजी नाटकर यांच्या मालकीची विहीर आहे. याथे मोहन नाटकर पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर रुस्तम यांनी माझ्या विहिरीतील पिण्याचे पाणी का घेतले? म्हणत मारहाण केली, अशी माहिती मोहन नाटकर यांनी दिली.
या घटनेनंतर अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही, असे तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
जखमी झाल्यानंतर मोहन यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर डॉ. अमित झंवर यांनी मोहन आणि इतर २ महिलांवर उपचार केले. मात्र, मोहन यांच्या डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे डॉक्टर झंवर यांनी सांगितले.