ETV Bharat / state

परळीच्या नाथ नगरात मोठी चोरी, पोलिसांपुढे आव्हान - परळीच्या नाथ नगरात मोठी चोरी

अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दोन तोळ्याचे बिस्कीट, एक तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याच्या पाटल्या, दहा तोळ्याच्या बांगड्या, दोन तोळ्याच्या अंगठ्या व नगदी २० हजार रुपये असा एकूण १० लाख ७७ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला.

robbery in Nath Nagar of Parli beed
robbery in Nath Nagar of Parli beed
author img

By

Published : Feb 7, 2021, 7:34 AM IST

परळी - शहरातील शिवाजी चौक भागातील नाथ नगरमध्ये राहत असलेल्या शेतकऱ्याच्या घरी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी चोरी करत १० लाख ७७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख लंपास केले. विशेष म्हणजे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी परळीस भेट देताच दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी दिवसाढवळ्या लूट करत शहर पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

शहरातील नाथनगर भागातील रहिवासी रविकिरण अंगद गुट्टे हे आपले आई-वडील व मुलांसह राहतात. त्यांची सोनपेठ तालुक्यातील उखळी येथे शेती असुन नेहमीप्रमाणे ते रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नीही घराबाहेर गेली होती. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दोन तोळ्याचे बिस्कीट, एक तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याच्या पाटल्या, दहा तोळ्याच्या बांगड्या, दोन तोळ्याच्या अंगठ्या व नगदी २० हजार रुपये असा एकूण १० लाख ७७ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा - राजस्थान करणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.