बीड : जळगाव येथील बँकेवर पडलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच बीड येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. बीडच्या लिंबागणेश या गावामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री चोरट्यांनी लोखंडी खिडकी गॅस कटरच्या साह्याने कट करून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये साडेबारा लाख रुपये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांनी केली सुरक्षा व्यवस्थेची मागणी : शासनाकडून ग्रामीण भागातील जनतेला बँकेच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण भागात विविध बँकांच्या शाखा उघडण्यात येतात. याच शाखांमधून ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक आपले व्यवहार शहरात न येता करतात. मात्र अशा घटना घडल्याने बँक व्यवस्थापकावर दबाव येत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकी ह्या बँकेतून किती रक्कम चोरट्यांनी पळवली आहे, हे मात्र जरी पोलीस तपासात कळले तरी अशा घटना घडूच नयेत याच्यासाठी जनतेने सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था करायला हवी, अशी सुद्धा मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून केली जात आहे.
बँकेत 'अशा' पद्धतीने केली चोरी : लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मागच्या बाजूला खिडकी असल्याने ती खिडकी, गॅस कटरने तोडण्यात आले. शिडीच्या माध्यमातून जाऊन चोरी केली आहे. पाठीमागच्या बाजुने लोखंडी शिडीवर चढून गॅस कटरच्या साह्याने पाठीमागील लोखंडी खिडकीची जाळी तोडून चोरी करण्यात आली आहे. नेकनुर पोलीस स्टेशनचे एपीआय शेख मुस्तफा व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
हेही वाचा :