बीड - गेवराई येथे सोमवारी (1 एप्रिल) पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी त्यांनी एका वयोवृद्ध महिलेचा खून करून सोन्या-चांदीचा ५ ते ६ लाखांचा ऐवज लंपास केला. पुष्पाबाई शिवा प्रसाद शर्मा (६२, रा. गेवराई, खडकपुरा ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पुष्पाबाईंच्या अंगावरील दागिने हिसकावून घेत असताना त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला. त्यामुळे दरोडेखोरांनी मोबाईल चार्जरच्या वायरने त्यांचा गळा आवळून खून केला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.