बीड - माजलगावचे भाजप उमेदवार रमेश आडसकर यांचे पुतणे ऋषीकेश आडसकर यांच्या गाडीला धारुर तालुक्यात अपघात झाला. ऋषीकेश त्यांच्या एका मित्राच्या पजेरो गाडीने धारुरकडे येत होते.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस मद्य विक्री बंद
धारुरहून बीडकडे निघालेल्या सना ट्रॅव्हल्सच्या गाडीने ऋषीकेश यांच्या गाडीला समोरून धडक दिली. या अपघातात ऋषीकेश आडसकर जखमी झाले आहेत. त्यांना धारुरच्या हजारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत जास्त गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गाडीतील एअरबॅग ओपन झाल्याने जीवितहानी टळली.