परळी (बीड) - परळी तालुक्यातील निवडणूक झालेल्या सात व येणाऱ्या काळात निवडणूक होणाऱ्या 83 अशा एकूण 90 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज तहसिल कार्यालयात चिठ्ठी पध्दतीने जाहीर करण्यात आले. पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात किरकोळ बदल होत तेच आरक्षण आज कायम राहिले आहे.
प्र. तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नायब तहसिलदार बी.एल. रुपनर, डॉ.क्षितिजा वाघमारे, विस्तार अधिकारी गुलभिले यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात
अनुसूचित जाती महिलासाठी सरपंचपदाचे आरक्षण -
खोडवा सावरगाव, मैंदवाडी, हाळंब, लिंबुटा, नागदरा, लेंडेवाडी, कौडगाव हुडा, लोणारवाडी.
अनुसूचित जाती -
गाढे पिंपळगाव दैठणाघाट,मांडवा बेलंबा,अस्वलआंबा,हेळंब,भोपला.
अनुसूचित जमाती महिलेसाठी जयगाव ही एकमेव ग्रामपंचायत राखीव झाली आहे.
ओबीसी महिलेसाठी -
पोहनेर, कावळ्याची वाडी, वाका, सेलु, डिग्रस, मोहा बोधेगाव, वाघाळा, परचुंडी, नागापूर, कन्हेरवाडी, करेवाडी.
ओबीसींसाठी -
हिवरा, गर्देवाडी, सर्फराजपूर, चांदापूर, नंदागौळ, तेलसमुख, बोरखेड, रामेवाडी, सिरसाळा, तडोळी, दौनापूर, मिरवट या ग्रा.पं.चे सरपंचपद आरक्षित झाले आहे.
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी -
ममदापूर, तपोवन, आचार्य टाकळी, कौडगाव, साबळा, रेवली, देशमुख टाकळी, मलनाथपुर, माळहिवरा, कौठळी मांडेखेल, वानटाकळी, वाघबेट, इंदपवाडी, डाबी, जिरेवाडी, लमाण तांडा, सेलु, लोणी, दादाहरी वडगाव कासारवाडी, नंदनज, वंजारवाडी, गुट्टेवाडी, खामगाव, दौंडवाडी.
खुला प्रवर्ग पुरुष -
भोजनकवाडी जळगव्हाण, पिंपरी, गोवर्धन, पाडोळी, औरंगपूर, कौडगाव घोडा, नाथरा, इंजेगाव, भिलेगाव, वडखेल, पांगरी, नागपिंपरी, सोनहिवरा, वानटाकळी तांडा, तळेगाव, दाऊतपुर, संगम, टोकवाडी ब्रह्मवाडी, सारडगाव, मरळवाडी लाडझरी, धर्मापुरी, मालेवाडी या गावचे सरपंचपद सुटले आहे.
परळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सिरसाळा ग्रा.पं.सह नागापूर, पोहनेर या ओबीसींसाठी तर मांडवा ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने या गावातील काही गावपुढाऱ्यांचा हिरमोड झाला आहे, तर काहींना संधी चालून आली आहे.