ETV Bharat / state

Animals Rescue In Beed : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल 45 जनावरांची सुटका; दोघांवर गुन्हा दाखल - जनावरांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 45 जनावरांची पोलिसांनी तत्परतेने सुटका (Animals Rescue In Beed) केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडच्या खडकत गावात पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्यासह टीमने (Police raided on slaughterhouse Beed) केली. गेल्या सहा महिन्यांमध्ये पोलिसांनी जवळपास 250 जनावरांची सुटका (police saved lives of animals) करून त्यांना जीवदान देण्याचे काम केले आहे. (Beed Crime)

Animals Rescue In Beed
45 जनावरांची सुटका
author img

By

Published : Jan 10, 2023, 8:24 PM IST

गोतस्करांवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस

बीड : आष्टी तालुक्यातील खडकतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांनी कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. (Animals Rescue In Beed) याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्याल टीमने कारवाई केली (Police raided on slaughterhouse Beed). याप्रकरणी बीडच्या (police saved lives of animals)आष्टी पोलीस ठाण्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल (case registered against animal smugglers) करण्यात आला आहे.

जनावर तस्करांविरुद्ध कारवाई : या अगोदरही अहमदनगर ते अहमदपूर मार्गावर नेकनूर येथे गाई घेऊन जाणारा एक टेम्पो पकडण्यात आला होता. याच टेम्पोमध्ये जवळपास 30 गाई होत्या. त्याच्यानंतर याच मार्गावर हैदराबादकडे तब्बल 35 बैल घेऊन जाणारी चारचाकी पकडण्यात आली होती. त्यामुळे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कत्तलखाने आहेत. कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडून त्यांचे गोशाळेत संगोपन केले जाते. एकीकडे जनावरांचे संगोपन करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासली की, जनावरांची विक्री करतात. मात्र जनावरांची विक्री करत असताना ती कत्तलखान्याकडे नेणाऱ्या व्यापाऱ्यांना करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

पोलिसांची कर्तव्यदक्षता : परवा रात्री उशिरा खडकत येथे पोलिसांच्या स्पेशल टीमने कत्तलखान्यावर ही कार्यवाही केली. यामध्ये 45 जनावरे पकडण्यात आली आहेत. ही जनावरे कत्तलखान्यात नेण्याआधी पोलिसांनी त्यांना जीवदान दिले. आष्टी तालुक्यातील खडकत या ठिकाणी पोलिसांची आतापर्यंतची तिसरी कार्यवाही आहे. या ठिकाणी गोवंशाच्या कत्तलीचे प्रकार दिसून आलेले आहेत. खडकत या ठिकाणावरूनच आम्ही जवळपास 150 जनावरे जप्त केली आहेत. बीड जिल्ह्यात देखील पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केल्या आहेत. आंबेजोगाई येथे सर्वांत मोठी कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर नेकनूर येथेही एक मोठी कार्यवाही पार पडली. गेल्या सहा महिन्यांमध्ये पोलिसांनी जवळपास 250 जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान देण्याचे काम केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.