ETV Bharat / state

दोन देशी दारू अड्ड्यांवर छापा, दोघांविरोधात गुन्हा दाखल - Police destroyed liquor stocks Majalgaon

शहरातील गैतम नगर परिसरात सुरू असलेल्या दोन बेकायदेशीर गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू साठा नष्ट केला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशी दारू अड्ड्यांवर छापा
देशी दारू अड्ड्यांवर छापा
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:54 PM IST

माजलगाव (बीड) - शहरातील गैतम नगर परिसरात सुरू असलेल्या दोन बेकायदेशीर गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू साठा नष्ट केला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणात दारू साठा नष्ट

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गौतम नगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये एक महिला गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी सकाळी 7 वाजता छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 35 लीटर दारू, व दारू तयार करण्यासाठी लागणारे 300 लिटर रसाय नष्ट केले, त्याची किंमत अंदाजे साडेबारा हजारांच्या घरात आहे. तर दुसऱ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात देखील मोठ्या प्रमाणात दारू साठा नष्ट करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - विरार पश्चिममधील 'त्या' रुग्णालयाविरोधात अखेर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.