बीड: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे धागेदोरे बीड जिल्ह्यातील मुंगी तालुका धारूर येथे असलेल्या शिवपार्वती कारखान्याला कोट्यवधी रुपयांची कर्ज दिले होते. सदर कारखान्याकडे तारणासाठी पुरेशी प्राॅपर्टी नव्हती. तरी हे कर्ज देण्यात आल्याचा आरोप असून त्या अनुषंगाने सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर कारखाना साइटवर छापेमारी करून माहिती घेतल्याचे समजत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? शिवपार्वती साखर कारखान्याची उभारणी पांडुरंग सोळुंके यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यात इतरही काही भागीदार आणि संचालक होते. या कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले; मात्र त्यानंतरच्या काळात कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आणि कारखान्याच्या संचालकांनी देखील हा कारखाना विकण्याचा प्रयत्न केले होते. मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी यात कारखाना घेण्यास तयार होते. मात्र वेगवेगळ्या न्यायालय प्रक्रियेमुळे ही विक्री प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेश दिले होते. याची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. हे सारे होत असताना पंजाब नॅशनल बँकेने गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यातूनच छापेमारी सुरू झाल्याचे समोर येत आहे.
सीबीआय तळ ठोकून: बीड जिल्हा हा राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेला जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये साखर उत्पादन करणारे कारखाने देखील मोठ्या संख्येने आहेत. यापैकीच शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआय पथकाने आज (गुरुवारी) छापा मारल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातील घोळाविषयी थेट सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत या दोन्ही केंद्रीय एजन्सीचे दहा ते पंधरा अधिकारी बीड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून दाखल झालेले होते.
अधिकाऱ्यांची कारखान्यात तपासणी: त्यांनी गुरुवारी प्रत्यक्षात कारखान्यावर जाऊन तपासणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या दोन्ही एजन्सीजच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा: Chitranagari In Goregaon: गोरेगावमध्ये 521 एकर जागेवर अत्याधुनिक चित्रनगरी उभारणार -मुनगंटीवार