ETV Bharat / state

घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी - सुरेश धस

प्रधानमंञी आवास योजनेतून आष्टी, पाटोदा व शिरूरमध्ये जवळपास चौदाशे घरकुले मंजुर करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा शासनाचा जीआर आहे. जीआर प्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांनी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धस
author img

By

Published : Jan 24, 2021, 7:31 PM IST

आष्टी (बीड) प्रधानमंञी आवास योजनेतून आष्टी, पाटोदा व शिरूरमध्ये जवळपास चौदाशे घरकुले मंजुर करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा शासनाचा जीआर आहे. जीआर प्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांनी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. वाळू उपलब्ध करून न दिल्यास घरकुल लाभार्थ्यांसह जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी धस यांनी दिला आहे.

916 घरकुलांचे काम सुरू

आष्टी येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये धस बोलत होते. पुढे बोलताना धस म्हणाले की, आष्टी 644, पाटोदा 524 तर शिरूर 217 असे तिन्ही शहरातील नवीन डिपीआर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले होते. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. ही घरकुल लभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरात 916 घरकुलांचे काम सूरू असून, त्यापैकी ज्या लाभार्थांना जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशांचे प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तसेच आता ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले आहे, त्यांचे काम तातडीने सुरू होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.