ETV Bharat / state

'पीक विम्याची भरपाई द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या'; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पिक विमा अजूनही मिळालेला नाही. बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवा-टोलवीची उत्तरे देत आहेत. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे.

author img

By

Published : Jul 9, 2019, 9:25 PM IST

बीड जिल्हाधिकारी कार्यालय

बीड - माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने शेतकऱ्यांना आता चक्क आत्महत्या करण्याची परवानगी मागण्याची वेळ आली आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील हजारो शेतकरी एकत्र आले. आणि विमा कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागत थेट जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली आहे. येत्या 14 जुलै पर्यंत विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 15 तारखेला दिंद्रुड बसस्थानक येथे सर्व शेतकरी लाक्षणिक उपोषण करेल. आणि या उपोषणानेही आमचा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असे गंभीर विधान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केले आहे.

या सगळ्या घटनेनंतर देखील जिल्हा प्रशासनाला घाम फुटलेला नाही. पिक विमा कंपनी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीत शेतात कशी तरी पेरणी केली आहे. पण मशागतीसाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम मिळण्याची आशा धुसरच आहे.

Intro:पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी; बीड च्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना मागितली परवानगी

बीड- जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन चा पिक विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या आहेत. बँक वाले देखील शेतकऱ्यांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. एकंदरीत आम्हा शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारीआस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देऊन पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता? असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अशाप्रकारे बीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत विमा कंपनी च्या गलथान कारभाराला वैतागत थेट जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना आत्महत्येेस परवानगी ची मागणी केली आहे. येत्या 14 जुलै पर्यंत विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 15 तारखेला दिंद्रुड बसस्थानक येथे सर्व शेतकरी लाक्षणिक उपोषण करू, या उपोषणाने ही आमचा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असे गंभीर विधान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केले आहे या सगळ्या घटनेनंतर देखील जिल्हा प्रशासनाला घाम फुटलेला नाही ही पिक विमा कंपनी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप देखील बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीत शेतात पेरणी कशी तरी भागवली पण मशागतीसाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम मिळण्याची आशा फोल ठरली आहे. Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.