ETV Bharat / state

शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजप सरकारने सुडबुध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात पवारांवर ही कारवाई केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

author img

By

Published : Sep 25, 2019, 6:09 PM IST

शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने

बीड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई निषेधार्थ परळी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच उद्या गुरूवारी (दि. 26 सप्टेंबर) परळी बंदची हाक पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने

हेही वाचा - राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

परळीच्या शिवाजी चौकात हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजप सरकारने सुडबुध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात पवारांवर ही कारवाई केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सुमारे तासभर चाललेल्या या निदर्शनात युवक नेते अजय मुंंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, नगरसेवक अनिल अष्टेकर, महिला जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:शरद पवार यांच्यावरील सुडबूध्दीच्या कारवाईच्या विरोधात बीडमध्ये निदर्शने; गुरुवारी परळी बंदची हाक

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकार सुडबूध्दीने करीत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी परळी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच या कृतीचा निषेध म्हणून उद्या गुरूवार दि.26 सप्टेंबर रोजी परळी बंदची हाक देण्यात आली आहे.

परळीच्या शिवाजी चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सरकारच्या कारवाईचा धिक्कार केला. पवार साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धास्ती घेवून त्यांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे धास्तावलेल्या भाजपाच्या सरकारने सुडबूध्दीने एम.एस.सी. बँकेच्या प्रकरणात पवार साहेबांवर कारवाई केली आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, तो आज या निदर्शनाच्या माध्यमातून समोर आला. 

सुमारे तासभर चाललेल्या या निदर्शनात युवक नेते अजय मुंंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, कृ.उ.बा. समितीचे संचालक माणिकभाऊ फड, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, नगरसेवक अनिल अष्टेकर, भाऊसाहेब कराड, संजय फड, जयप्रकाश लड्डा, शरीफभाई, महिला जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर, संजय आघाव, के.डी. उपाडे, अनंत इंगळे, प्रणव परळीकर, रवि मुळे, सिराज भाई, माणिकराव सातभाई, सुरेश नानवटे, राधाकृष्ण साबळे, प्रताप देशमुख, धोंडीराम धोत्रे, सचिन मराठे, सचिन जोशी, दत्ता सावंत, तौफीक भाई, मेहपाल सावंत, जयदत्त नरवटे, अल्ताफ पठाण, बळीराम नागरगोजे, मंगेश मुंडे, ज्ञानेश्वर होळंबे, बलराज सोळके, प्रशांत कोपरे, बालाजी दहिफळे, पवन फुटके, बाळु अघाव, रवि आघाव, वैभव कराड, शेख मनसब भाई, रमेश मस्के, विष्णु सातभाई, प्रशांत गित्ते, भागवत मुंडे, गणेश सुरवसे, जितू नव्हाडे, बाशीद भाई, विश्वजीत कांबळे, अंबादास रोडे, मोईन काकर, पवनकुमार घोडके, मुंजाहारी मुंडे, लखन सिरसाट, अन्सर शेख, नरेश हालगे, चंपत मुंडे, राज जगतकर, शरद कावरे, श्रीपाद पाठक, शशिकांत बिराजदार, प्रताप समिंदरसवळे, अमोल काकडे, जीवन रोडे, श्रीहरी कवडेकर, फुलचंद गायकवाड, विजय मिसाळ, विष्णु साखरे, रामदास कराड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्या परळी बंदची हाक-
दरम्यान सरकारच्या जूलमी कारवाई विरोधात उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जूलमी राजवट चालणार नाही, असा इशारा यावेळी युवक नेते अजय मुंडे यांनी दिला. Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.