परळी (बीड) - शहरातून अवैधरित्या राखेची वाहतूक करू नये, असे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र सर्रासपणे राखेची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेत अवैध वाहतूक करणार्या सहा टिप्परवर शहर पोलीसांनी कारवाई करत हे टिप्पर जप्त केले आहे.
परळी शहरामधून अवैधरित्या राखेची वाहतूक करण्यास बंदी आहे. असे असतानाही काही जण लपूनछपून राखेची वाहतूक करत आहेत. ही बाब परळी शहर पोलीसांच्या लक्षात येताच या अवैधरित्या राख घेऊन जाणार्या सहा टिप्परवर कारवाई केली आहे. शिवाय यापुढेही पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. असे संकेत परळी शहर पोलीसांनी दिले आहे.
हेही वाचा-परमबीर सिंग यांचे कथित पत्र; शरद पवार-जयंत पाटील यांच्यात फोनद्वारे चर्चा