ETV Bharat / state

अंतुलेंनीच केला होता काँग्रेस विरोधात प्रचार; बीडमधील 'त्या' आठवणी आजही ताज्या - काँग्रेस

१९८४ च्या दरम्यान काँग्रेसचे नेते बॅ. ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे वाद सुरू होते. नेतृत्वाला शह देण्यासाठी त्यांनी पक्षाच्या विरोधातच बंड केले.

बीडच्या माजी खासदार केशरबाई क्षीरसागर
author img

By

Published : Mar 19, 2019, 9:52 AM IST

बीड - लोकसभा निवडणूक ही आपल्या देशातील कोणत्या उत्सवापेक्षा कमी नसते. प्रत्येक निवडणुकीची काहीतरी खासीयत असते. १९८४ ची निवडणूक बीडकरांना अजूनही लक्षात आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार केशरबाई क्षीरसागर यांना काँग्रेसचेच नेते माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा विरोध झाला होता. तरीही क्षीरसागर अनेक विरोधकांना नमवून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या.

बीड हे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, कॉ. गंगाधर बुरांडे, बापुसाहेब काळदाते यांनी बीडचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेले. सुंदरराव सोळंके आणि गोपिनाथ मुंडे यांच्या रुपाने बीडने राज्याचे नेतृत्वही केले. त्यांच्याच जोडीला माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे नावही घेतले जाते.

१९८४ ची निवडणूक केशरबाई क्षीरसागरांनी गाजवली. समोर अनेक दिग्गज उमेदवार उभे असताना आणि पक्षांतर्गत फुटीचे आव्हान असतानाही त्यांनी विजय खेचून आणला होता. ९ तगड्या उमेदवारांचा पराभव करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यावेळच्या ४ लाख ७३ हजार ११६ मतांपैकी केशरबाईंना २ लाख २१ हजार ४२१ मते मिळाली होती.

माजी मुख्यमंत्रीच होते विरोधात

१९८४ च्या दरम्यान काँग्रेसचे नेते बॅ. ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे वाद सुरू होते. नेतृत्वाला शह देण्यासाठी त्यांनी पक्षाच्या विरोधातच बंड केले. काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले. बीडमध्ये केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांनी श्रीधरराव गीते यांना पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले. पण, क्षीरसागर गीतेंना हरवून विजयी झाल्या. बीडकरांना ही निवडणूक कायम स्मरणात राहिली आहे.

हे उमेदवार होते रिंगणात -
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून गोविंदराव काकडे, भानुदास कांबळे, गंगाधर गीते, सुधाकर पाटील, मझहर अली, रतन सातपुते, नाथा सोनवणे, सौंदळे गुरुजी व श्रीधरराव गीते हे यांचा समावेश होता. भाजपमधून माजी आमदार आदिनाथ नवले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. याच निवडणुकीत बीड जिल्ह्यातील मुस्लीम मतदार केशरबाईंच्या काही प्रमाणात विरोधात गेला होता. तरीदेखील बीड जिल्ह्यावर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता.

Intro:खालील बातमीतील स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा पासपोर्ट फोटो डेस्क च्या व्हाट्सअप वर सेंड केला आहे.....
*****************

बीड लोकसभा 1984 ; 'त्या' लढतीची आजही होते चर्चा; नऊ अपक्षांसह भाजप उमेदवारांची केली होती चितपट

बीड- राजकीय दृष्ट्या राज्यात बीड जिल्ह्याने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. बीड जिल्ह्यातील निवडणुकांवर संपूर्ण राज्याचे लक्ष असते इथल्या लढतींची संपूर्ण राज्यभर चर्चा होत असते. 1984 च्या लोकसभेची अजूनही आठवण काढली जाते. ती लढत आजही बीडकरांचा स्मरणात आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. तेव्हा नऊ अपक्षांसह भाजपच्या उमेदवाराची चित्रपट करण्यामध्ये तेव्हाच्या काँग्रेसच्या उमेदवार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांना यश आले होते. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार उभे करून स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांना पराभव करण्यासाठी अनेक खेळ राज्यातील व बीड जिल्ह्यातील नेत्यांनी केल्या होत्या.

Body:बीड लोकसभा मतदार संघावर महिला खासदार म्हणून स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. 1984 च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातून अपक्ष आणि एका भाजपच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या महिला उमेदवाराने पराभव केला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये 9 अपक्ष एक भाजपचे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात 4 लाख 73 हजार 116 इतके मतदान झाले होते. यामध्ये स्वर्गीय केशरकाकूंना 2 लाख 21 हजार 421 एवढी मते तर दुसऱ्या नंबर वर राहिलेले श्रीधरराव गीते यांना 1 लाख11हजार 59 मते अपक्ष असतानाही पडली होती तर भाजपचे आदिनाथ नवले यांना 1 लाख 2 हजार 260 एवढी मते मिळाली तर उर्वरित मतदान अपक्ष उमेदवारांना झाले होते. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांनी बाजी मारली होती.

तेव्हाची अशी होती राजकीय परिस्थिती-
1984 दरम्यान राज्यातील राजकारण संपूर्णतः ढवळून निघाले होते. त्यावेळी अंतुले यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरून हटविले होते. या सगळ्या परिस्थितीचा वचपा काढण्यासाठी म्हणून ए. आर. अंतुले यांनी बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांना कडवा विरोध करत अपक्ष उमेदवार श्रीधरराव गीते यांना पाठिंबा दिला होता. ए. आर. अंतुले यांच्या तेव्हाच्या भूमिकेमुळे काँग्रेसला मुस्लिम मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले मात्र स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यावर जबरदस्त पकड असल्यामुळे त्यांना 1984 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाले होते.

Conclusion:1984 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून गोविंदराव काकडे, भानुदास कांबळे, गंगाधर गीते सुधाकर पाटील, मझहर अली, रतन सातपुते, नाथा सोनवणे , सौंदळे गुरुजी व श्रीधरराव गीते हे यांचा समावेश होता. भाजपातून माजी आमदार आदिनाथ नवले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. याच निवडणुकीत बीड जिल्ह्यातील मुस्लिम मतदार स्वर्गीय केशर काकूंच्या काही प्रमाणात विरोधात गेला होता. तरीदेखील स्वर्गीय काकूंनी बीड जिल्ह्यावर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.