बीड : आजचा दिवस बीड जिल्ह्यासाठी हा काळा दिवस म्हटला जातो. कारण राज्याच्या राजकारणातून थेट देशाच्या राजकारणामध्ये पोहोचणारे गोपीनाथ मुंडे यांचे या दिवशी निधन झाले होते. 3 जून 2014 रोजी त्यांच्या कारचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. दरम्यान आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिन आहे. या दिवशी अनेक नेतेमंडळींनी परळीमधील गोपीनाथ गडावर हजेरी लावली आणि गोपीनाथ मुंडेंना आंदराजली वाहली. पंकजा मुंडे यांनीही आंदराजली वाहिली आणि स्वप्न बदलली असल्याचे सांगितले.
वादळाच्या लेकीचे स्वप्न बदलले : परळीमधील गोपीनाथ मुंडे गडावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसेंसह रोहिणी खडसे आणि धनंजय मुंडे नतमस्तक झाले. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना आंदराजली वाहिली. यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी वादळाची लेक आहे. येथेही वादळ येणार होते, त्याची दिशा बदलली. पण परिवर्तन घडणार आहे. तसेच काळानुसार स्वप्न बदलणार, असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे : बाकीचे जे म्हणतील त्याच्यावर मला भाष्य करायचे नाही. आजचा 3 जूनचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्यासाठी वाईट असेल पण माझ्यासाठी फार भावनिक दिवस आहे. आज माझ्यासाठी राजकारण शून्य दिसत आहे. आज या ठिकाणी जे लोक आलेले आहेत. त्यांना मी काही दिलेले नाही त्याचबरोबर कोणत्याही राजकारण्यांना मी येथे बोलावलेले नाही. जे लोक मुंडे साहेबावर प्रेम करतात ते लोक या ठिकाणी आले. त्या नात्याने नाथाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. धनंजय मुंडेही येथे आले होते त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला येथे येण्याचा अधिकार आहे.
स्वप्नही काळानुसार बदलत असतात : नाथाभाऊ तर त्यांचे सहकारी होते. आम्ही मुंडे साहेबांच्या सहवासात आल्यानंतर लोकांना ऊर्जा मिळत असेल तर मला त्याचा आनंद आहे. या करण्यात येणाऱ्या भाषणात काय बोलणार असा प्रश्न पंकजा मुंडे यांना पत्रकाराने केला असता त्यावर उत्तर पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे कोणतेही भाषण दुसऱ्या भाषणासारखे नसते, मी ठरवून बोलत नाही. एखादा जेव्हा स्टेटमेंट करतो तेव्हा तो त्यावेळेस तो एखादी पत्रकार परिषद घेऊन बोलत असतो. भाषणात आपण समोरील व्यक्तींना संबोधन करत असतो, त्यावेळी बोलण्यात येणाऱ्या शब्दांचे आणि वाक्यांचे पोस्टमॉर्टम केला जातो. आज मी जे बोलणार आहे ते 3 वाजता बोलणार आहे आणि तुम्ही त्यांचे पोस्टमार्टम करणारच आहे. त्याची मला सवय झाली आहे. तुमच्या या गोष्टीला मी प्रेम समजते असेही त्या म्हणाल्या. भाषणावेळी मी ज्यावेळेस बोलते त्यावेळेस माझ्याकडे कसलीही कागद नसतो चिट्ठी नसते काय बोलेल तिने तुमच्या समोरच बोलणार आहे. मुंडे साहेबांचे वादळी जीवन होते आणि मी वादळाची लेक आहे. येथं वादळ येणार होते त्याचे डायरेक्शन बदलले. बाबा म्हणजे माझे वडील हा शब्द म्हणजे माझ्यासाठी फार व्यापक आहे. इतरांसाठी ते साहेब माझ्यासाठी ते बाबा आहेत. यात फरक आहे. येथे परिवर्तन घडत राहणार असल्याचे म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्वप्नही बदलली आहेत. स्वप्न 1995 ची वेगळी होती, 2005 ची वेगळी होती. तर 2019 ची वेगळी होती आणि आता 2025 ची वेगळी असणार आहेत. त्यामुळे स्वप्नही काळानुसार बदलत असतात.
तावडेंना उत्तर देणे टाळले : स्वप्न बदलणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडणार आहेत की काय असा प्रश्न समर्थकांना पडला आहे. दरम्यान विनोद तावडेंच्या विधानावर पंकजा मुंडे काही बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या,
विनोद तावडे जे बोलले आहेत त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, पण ते आमचे महामंत्री आहेत. मी कुणाचेही काही उत्तर देणार नाही - पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान आज 3 जून 2014 वर्षी नेते गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातामध्ये निधन झाले होते. गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.
हेही वाचा -