ETV Bharat / state

Pankaja Munde Dasara Melava: पंकजा मुंडे दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार? नाराजीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लागले लक्ष - पंकजा मुंडे दसरा मेळावा भाषण

बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. (pankaja munde dasara melava). दुपारी 12.55 वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे भाषणाला सुरुवात करणार आहेत. (pankaja munde speech)

Pankaja Munde
Pankaja Munde
author img

By

Published : Oct 5, 2022, 10:55 AM IST

Updated : Oct 5, 2022, 11:28 AM IST

बीड: बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. (pankaja munde dasara melava). परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली आहे. ही रॅली बीड - सिरसाळा - दिंद्रुड - तेलगाव - वडवणी - घाटसावळी - बीड - पाटोदा मार्गे सावरगावघाट येथे भगवान भक्ती गडावर पोहोचणार आहे.

दुपारी 12 वाजेपर्यंत पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवान भक्ती गडावर पोहोचतील. त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुपारी 12.55 वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे भाषणाला सुरुवात करणार आहेत. (pankaja munde speech).

समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन: पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी आणि पाण्याची बाटली घेऊन भगवान भक्तीगडावर या. सावरगावच्या दसरा मेळाव्याची आपली परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी देखील उत्सूक आहे. गेल्यावेळी हेलीकाॅप्टरमुळे मला थोडा उशीर झाला होता, मात्र यावेळी तसे काहीही होणार नाही. तुम्ही मोठ्या संख्येने येणार आहात याची मला कल्पना आहे, त्यामुळे तुमची मोठी बहिण या अधिकाराने मी तुम्हाला काही सूचना देणार आहे. त्या सुचना तुम्ही पाळाल याची मला खात्री आहे. दसरा मेळावा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करायचा आहेच, पण त्यासोबतच काळजी देखील घ्यायची आहे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

गडावर तगडा पोलिस बंदोबस्त: दसरा मेळाव्यानिमित्त भगवान भक्तीगडावर लाखोंचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Last Updated : Oct 5, 2022, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.