ETV Bharat / state

बाबांच्या स्मृतिदिनी मी समाधीचे दर्शन घेऊ शकत नाही; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत - गोपीनाथ मुंडे स्मृतिदिन

दरवर्षी 3 जूनला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तेथूनच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधितही करतात. मात्र यावर्षी कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे बंधनकारक आहे. ही स्थिती लक्षात घेऊन यंदा मुंडे यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

pankaja munde
पंकजा मुंडे
author img

By

Published : Jun 1, 2020, 1:34 PM IST

बीड - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतिदिन आहे. 'गोपीनाथ मुंडे साहेंबावर प्रेम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांनी 3 जून रोजी गोपीनाथ गडावर न येता आपल्या घरीच राहून मुंडे साहेबांचा स्मृतिदिन करावा', असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच मी ही यावेळी बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकत नसल्याची खंत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

दरवर्षी 3 जूनला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तेथूनच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधितही करतात. मात्र यावर्षी कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळणे बंधनकारक आहे. ही स्थिती लक्षात घेऊन यंदा मुंडे यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'आता गोपीनाथ गडावर कार्यकर्ते जमा होणार नाहीत. हा निर्णय मनावर दगड ठेवून घेतला आहे. या निर्णयामुळे मी व्यथित झाले आहे. खा. प्रीतम मुंडे या परळीत आहेत. त्याच समाधीस्थळी जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करतील. प्रशासनावर ताण येऊ नये व सोशल डिस्टन्सबाबत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या घरातच राहून गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फेसबुक लाइव्हवरून साधणार संवाद-

पंकजा मुंडे स्वतः गोपीनाथ गडावर हजर राहू शकणार नाहीत. मात्र त्या 3 जून रोजी फेसबुकच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. सध्या पंकजा मुंडे या राजकीय विजनवासात आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद सदस्य निवडीमध्ये त्यांना डावलून लातूरचे रमेश कराड यांच्या गळ्यात आमदारकीची माळ भाजपाने टाकली. या घडामोडीनंतर आता गोपीनाथ मुडेंच्या स्मृतिदिनी बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप होईल का? याची मोठी चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.