बीड : दरवर्षी प्रमाणे १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा यावर्षी आपण वेगळे काही तरी करू या. यावर्षी गोपीनाथ गड तुम्ही आपल्या परिसरात घेऊन जा (Take Gopinath Gad to your locality ). गांव असेल, गल्ली असेल, वाॅर्ड असेल तिथपर्यंत गोपीनाथ गड घेऊन जा. जे कोणी मुंडे साहेबांचे कार्यक्रम करू इच्छित असेल अशांनी एकत्र या आणि मुंडे साहेबांची जयंती ( gopinath Mundes birth anniversary ) त्यांना शोभेल अशा समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करा असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ( BJP National Secretary Pankajatai Munde ) यांनी राज्यातील अप्रिय घटनांबद्दल यादिवशी अर्धा तास मौन बाळगण्याचे आवाहन ( call to silence for half an hour ) कार्यकर्त्यांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे केले आहे.
एकीचे बळ जिवंत ठेवणे : पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, आपण गेली अनेक वर्षे अनेक कार्यक्रम घेत आहोत, स्वतःचेच विक्रम स्वतःच मोडत आहोत आणि नवीन विक्रम रचण्यासाठी काम करत आहोत. मुंडे साहेबांच जाणे हे आपल्यासाठी जेवढे वेदनादायी आहे, तेवढेच त्यांचे स्वप्न जिवंत ठेवणे, आपल्या एकीचे बळ जिवंत ठेवणे, कुठल्याही अन्यायाला सामोरे जाण्याची ताकत ठेवणे हे ही आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून उर्जा, प्रेरणा आणि आशा याचा संगम म्हणून गोपीनाथ गड निर्माण केला आहे.
समाजोपयोगी कार्यक्रमांनी जयंती साजरी करा : या गोपीनाथ गडावर आपण सर्वजण 12 डिसेंबरला उत्साहाने येता. 3 जूनला येता, दसरा मेळाव्याला येता. पण आज मी आपल्या समोर एक वेगळा प्रयोग करण्यासाठी उभी आहे. दरवर्षी आपण गोपीनाथ गडावर येतो. मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त एकत्र येतो. वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम करतो. पक्ष, विचार याच्या पलिकडे अनेक नेते गोपीनाथ गडावर येऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन गेले. आपण त्यांचे मार्गदर्शन ऐकतो, मुंडे साहेबांचे विचार घेऊन तिथून निघतो. यावर्षी माझी आपणांस विनंती आहे, दरवर्षी सारखे गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा यावर्षी आपण वेगळे काही तरी करू या. यावर्षी गोपीनाथ गड तुम्ही आपल्या परिसरात घेऊन जा. गाव असेल, गल्ली असेल, वाॅर्ड असेल तिथपर्यंत गोपीनाथ गड घेऊन जा. जे कोणी मुंडे साहेबांचा कार्यक्रम करू इच्छित असेल अशांनी एकत्र या आणि मुंडे साहेबांची जयंती त्यांना शोभेल अशी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करा.
अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन : मी 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडाचे दर्शन घेणार आहे. 11 ते 11.30 मी तुमच्यासमवेत राज्याच्या कुठल्याही कोपर्यात तुम्ही असाल, कोणत्याही भागात असाल, तुमच्यासमवेत अर्ध्या तासाचे मौन बाळगणार आहे. हे मौन कशासाठी तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अप्रिय घटनांसाठी, मग हया अप्रिय घटना कुठल्या ? छत्रपती शिवरायांचा अवमान असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, आपल्या दिल्लीमध्ये केलेल्या एखाद्या भगिनीची निर्घृण हत्या असेल की माझ्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आत्महत्या असेल की जातीवादातून एखाद्या वर्गावर झालेला अन्याय असेल या अशा अनेक अप्रिय घटना आहेत, ज्या मुंडे साहेबांना कधीही मान्य नव्हत्या, ज्याच्यासाठी ते आवाज उठवायचे. या अप्रिय घटनांना आपण एक प्रातिनिधिक तिलांजली देण्यासाठी हे मौन धारण करायचे आहे. मौनानंतर दुपारी 12 वा. मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अनेक लोकेशनला मी झुम लिंक देणार आहे. त्याठिकाणी जिथे कार्यक्रम होत आहे, तिथे ते लॅपटॉपवर किंवा एखादी स्क्रीन लावली असेल तर त्यावर माझं मार्गदर्शन ते पाहू शकतील. तुम्हाला जोडण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. कारण सर्वच जण गडावर येऊ शकणार नाहीत. पण भरपूर लोक या माध्यमातून माझ्याशी लाईव्ह जोडू शकतील. यावर्षी मुंडे साहेबांच्या जयंतीचा असा अनोखा कार्यक्रम आपण करू. यावर्षी गोपीनाथ गडावर न येता गोपीनाथ गड आपल्या परिसरात घेऊन जा, तिथेच आपण मुंडे साहेबांची जयंती साजरी करा अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे.