बीड- जिल्ह्यातील गेवराई जवळील सहारा अनाथालयामध्ये एका अनाथ मुलीचा विवाह थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक हात मदतीसाठी धावून आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिने नव्या जगात पदार्पण केले.
हेही वाचा- नमस्ते ट्रम्प : ताजमहाल पाहून भारावले ट्रम्प दाम्पत्य, आता दिल्लीला रवाना..
प्राजक्ता उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी भागात शाळेच्या आवारात पोलिसांना आढळून आली होती. त्यावेळी ती अवघ्या 9 वर्षाची होती. त्यावेळी पोलिसांनी पंचनामा केला असता तिचे आई-वडील मृत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्राजक्ता या अनाथालयात आली होती. प्राजक्ताचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. प्राजक्ताने तिचा जीवनसाथी निवडला आहे. त्यानुसार मावळ (ता.जि.पुणे) मधील नवनाथशी तिचा विवाह झाला आहे. नवनाथ हा सीसीटीव्हीचा व्यवसाय करतो.
गेवराईपासून जवळ असलेल्या बालग्राम अनाथालयात एखाद्या उद्योजकांच्या विवाहाला लाजवेल असा तिचा विवाह पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दानशूर, व्यावसायिक, उद्योजक, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हिंदू संस्कृती प्रमाणे विधीवत हा विवाह संपन्न झाला.