ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात केवळ 43.35 टक्केच पाणीसाठा - बीड जिल्हा लेटेस्ट न्यूज

बीड जिल्ह्यात एकूण 43.35 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यातच वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन व अवैध पाणी उपसा यामुळे सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

जिल्ह्यात केवळ 43.35 टक्केच पाणीसाठा
जिल्ह्यात केवळ 43.35 टक्केच पाणीसाठा
author img

By

Published : Apr 10, 2021, 7:06 PM IST

बीड - बीड जिल्ह्यात एकूण 43.35 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यातच वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन व अवैध पाणी उपसा यामुळे सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. शिल्लक पाणीसाठा जपून न वापरल्यास व पाऊस लांबल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

बीड जिल्ह्यात लघू व मध्यम असे एकूण 144 सिंचन प्रकल्प आहेत. या सिंचन प्रकल्पांमध्ये 43.35 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. बीड जिल्ह्यात लघुसिंचन प्रकल्प एकूण 126 असून या प्रकल्पांमध्ये 27.55 टक्के एवढा तर 16 मध्यम प्रकल्पांमध्ये 46.78% पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. जिल्ह्यात आज घडीला तरी पाणीटंचाई नाही, परंतु पावसाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात शिल्लक असलेला पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या शेवटी पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

असा होत आहे पाणीसाठा कमी

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे त्याचबरोबर अवैध पाणी उपस्यामुळे दर आठवड्याला प्रकल्पांमधून 30 दशलक्ष घनमीटर पाणी कमी होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन होणारा अवैध पाणी उपसा रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

माजलगाव व मांजरा प्रकल्प महत्त्वाचे

बीड जिल्ह्यात दोन सिंचन प्रकल्प मोठे आहे. त्यामध्ये माजलगाव येथील सिंचन प्रकल्पामध्ये 50% पाणीसाठा आहे. म्हणजेच 164. 600 दलघमी पाणी शिल्लक असून, यापैकी 158 दलघमी एवढा पाणीसाठा उपयुक्त आहे. याच प्रकल्पावरून बीड शहराला तसेच माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावांना पाणी पुरवठा केला जातो. एकट्या बीड शहराला एक वेळेला पाणीपुरवठा करण्यासाठी 28 एमएलडी एवढे पाणी लागते. त्यामुळे माजलगाव प्रकल्पामधील पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. याच बरोबर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मांजरा प्रकल्पातून केज व धारूर तालुक्यातील बारा गावांना पाणी पुरवठा केला जातो, तसेच बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेला लातूर जिल्ह्याला देखील मांजरा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. आज घडीला मांजरा प्रकल्पात 50 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे 95.652 दलघमी पाणीसाठा असून, यातील 88. 525 दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.

एका महिन्यात 20 टक्के पाणी कमी झाले

बीड जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात सरासरी 38 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत असते. 4 मार्च 2021 दरम्यान बीड जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये 60 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. मात्र वाढत्या तापमानामुळे बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पामधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील एक महिन्यात 20 टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले असल्याचे समोर आले असून, आज घडीला जिल्ह्यात केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.