बीड- जिल्हा आरोग्य विभागाला रविवारी रात्री उशिरा 631 स्वॅबच्या अहवालापैकी 195 अहवाल प्राप्त झाले. या मध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात 102 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर सव्वाशे रुग्ण बरे झाले आहेत.
बीड जिल्ह्यातून शनिवारी आणि रविवारी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या 631 स्वॅबपैकी 195 चा अहवाल प्राप्त झाला असून उर्वरित अनिर्णीत आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चौसाळा येथील 3, बीड शहरातील शाहू नगर, तुळजाई नगर, संत तुकाराम नगर, भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील प्रत्येकी एक आणि आष्टी व शिरुर मधील प्रत्येकी एक अशा रुग्णांचा समावेश आहे. परळीचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रशासनाने अगोदरच परळीतील टाळेबंदी दोन दिवसांनी वाढवली आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
बीड जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा १०२ झाला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे.