ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त टिप्पणी (कमेंट) केली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांनी कार्यालयात जाऊन कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकली.

officer wrong words about uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द
author img

By

Published : Dec 31, 2019, 8:18 AM IST

Updated : Dec 31, 2019, 9:35 AM IST

बीड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याला काळे फासण्यात आले आहे. हा प्रकार बीड पंचायत समितीच्या आवारात सोमवारी दुपारी घडला. फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर संतप्त महिला शिवसैनिकांनी शाई फेकत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला.

महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई

हेही वाचा - आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत; मंत्रिपद डावलल्याने नाराजी कायम

बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त टिप्पणी (कमेंट) केली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांनी कार्यालयात जाऊन कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याचा देखील प्रयत्न केला.

हेही वाचा - बीडमध्ये खासगी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप

तसेच इथून पुढे ठाकरे सरकारबद्दल अपशब्द काढला, तर याद राख, असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या प्रकाराची सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांनी पंचायत समितीमध्ये गर्दी केली होती. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.

Intro:उद्धव ठाकरे बाबत अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्याला फासले काळे
बीड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याला त्याचा कार्यालयात जाऊन काळे फासण्या चा प्रकार बीड पंचायत समिती च्या आवारात सोमवारी दुपारी घडला. अधिकाऱ्यांच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकत त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न झाला आहे. फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर संतप्त महिला शिवसैनिकांनी शाई फेकत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रर बीड पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजता घडला. या प्रकारची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण कार्यालयात जाऊन त्याचा पाणउतारा करत त्यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याची प्रयत्न केला.

शिवसेनेच्या फेसबुक पेजवर जावून खालच्या पातळीची कमेंट करण सुनील कुलकर्णी यांना चांगलेच महागात पडले आहे. बीडमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानी या अधिकाऱ्याला कार्यालयातच फैलावर घेतले. अधिकाऱ्यांची लायकी काढत माफी मागायला लावली. एवढेच नाही तर या अधिकाऱ्यांच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकली व तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे ठाकरे सरकार बद्दल अपशब्द काढला तर याद राख असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवरत झालेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा सुरू सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांची गर्दी होती. यातच हा सगळा प्रकार घडल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.

Body:बConclusion:ब
Last Updated : Dec 31, 2019, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.