बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तीन आठवड्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू (youth Suspicious death in beed ) झाला आहे. सदरील घटना ही सोमवार ( 9 नोव्हेंबर ) रोजी रात्री घडली असून यामध्ये घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी - या प्रकरणात नातेवाईकांनी गेवराईचा पोलीस ठाण्यात ठिय्या देखील दिला होता. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
पुढील चौकशी सुरू - सदरील मृत तरुणाच्या मृतदेहावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आता या प्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र यासंबंधी कोणता गुन्हा दाखल केला जातो, हे पाहणे गरजेचे आहे.