बीड : सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. अनेक तरुण-तरुणी लग्न बंधनात पाहायला मिळतात. लग्नानंतर सुखाचा संसार व्हावा असे मुलीच्या व मुलाच्या आई वडिलांचे स्वप्न असतात. आपली मुलगी सुखाने नांदावी यासाठी मुलीकडील मंडळी सर्व गोष्टी मुलींना देण्याचा प्रयत्न करतात; मात्र नशेच्या आहारी गेलेल्या अक्षयने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नवविवाहित तरुणाची हत्या : मागील वर्षी गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावातील एका नवविवाहित तरुणाला त्याच्याच पत्नीने मारल्याची घटना घडली होती. मात्र त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचा बनाव आरोपीने केला होता. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच नवविवाहितेने घटनेची कबुली दिली. नवरा पसंत न आल्याने आपण त्याची हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होते ना होते तोच पुन्हा एकदा नवविवाहित तरुणाने आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती अक्षयचा भाऊ ज्योतिरादित्य सरोदे यांनी पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करत पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
अक्षय असायचा व्यसनाधीन : अक्षय सरोदे व्यसनाच्या आहारी गेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो दारूचे व्यसन करत होता. मागील महिन्यामध्ये त्याचा 13 एप्रिल रोजी विवाह देखील झाला होता. मात्र त्याचे व्यसन कमी झाले नव्हते. लग्नानंतर तो एवढा व्यसनाच्या आहारी गेला की, दररोज दारू प्यायला लागला. पण, त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक : निरुत्साही, नैराश्य, तणाव, अपयश आदींमुळे तरुणांमध्ये नाकर्तेपणाचे भाव वाढतात. काही परिस्थिती ही सांगताही येत नाही, सहनही होत नाही. अशा परिस्थितीत तरुणांना धीर आणि आधार देण्याची गरज असते. मात्र त्याचा अभाव हल्लीच्या तरुणांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. याच घुसमटीत हृदयविकारासारख्या जीवघेण्या आजाराचे तरुण बळी पडतात. ज्या तरुणांमध्ये घुसमट वाढतच जाते असे तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यासाठी ऐन उमेदीतील तरुणांशी संवाद साधल्यास, आपले कुणीतरी आहे, आपली काळजी करणारे कुणीतरी आहे. आपले वाईट होत असताना कुणीतरी आपल्याला सावरणारे आहे ही मानसिकता तयार होते. मनावरचा ताण कमी होतो. एकटेपणा आणि एकाधिकार हेच तणावाची हृदयविकार आणि आत्महत्येची कारणे आहेत. त्यामुळे पालकांचा संवाद हा याला संजीवनी ठरतो.
हेही वाचा: