बीड - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, 8 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 3 व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत आले असल्यामुळे त्यांची उद्या पुर्नतपासणी करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. मंगळवारी बीड जिल्ह्यामध्ये एकूण आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजघडीला बीड जिल्हा रुग्णालयात एकूण 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, तीन व्यक्तींचे अहवाल अनिर्णायक आले असल्यामुळे त्यांची पुन्हा बुधवारी तपासणी होणार आहे. सदरील अहवाल मंगळवारी रात्री बारा वाजता बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे.