ETV Bharat / state

'...अप्पा मला बळ द्या', धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

आज (बुधुवार) माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथे जाऊन त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी फेसबुकवर एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे.

ncp leader dhananjay munde
धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
author img

By

Published : Jun 3, 2020, 9:43 PM IST

बीड - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका तथा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आभिवादन केले. गोपीनाथगड येथील स्मृतिस्थळी जाऊन यांनी अभिवादन केले. त्यांनतर मंत्री धनंजय मुंडे यांनी 'आप्पा मला बळ द्या' अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

3 जून 2014 रोजी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. राजकीय जडण घडणीत धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झाले होते. दरम्यान, धनंजय मुंडेंनी पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे सांगणारा एक संग्रहित व्हिडिओ पोस्ट करून एक भावनिक पोस्ट केली आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंना अप्पा म्हणत. सत्तेत आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित उपेक्षित, दीन-दुबळ्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी या सरकारमध्ये मिळाली असल्याचे धनंजय मुंजेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब - कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. या वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या; अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथील स्मृतीस्थळी जाऊन आज (बुधुवार) दुपारी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, संजय गांधी रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तपोवनचे सरपंच चंद्रकांत कराड, युवानेते अभय मुंडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.