बीड - आता भाजपला प्रचारासाठी सनी लियोन या अभिनेत्रीचा सहारा घ्यावा लागत आहे. एका संकेतस्ळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपने प्रचारासाठी सनी लियोनला ७५ लाख रुपये दिल्याची बाब समोर आली आहे. भाजपच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत कार्यकाळातील ही सर्वात दुर्दैवी बाब असल्याचे मत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. शहरात आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारने साडेचार वर्षाच्या काळात काही केले नाही. भाजपला सनी लियोनसारख्या अभिनेत्रीचा प्रचारासाठी सहारा घेण्याची वेळ आली आहे. संकेतस्थळाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपने सनी लियोनला प्रचारासाठी ७५ लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब दुर्दैवी आहे. भाजप सरकार स्वतःचे अपयश पचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कोण असेल? याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबत सर्वस्वी निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारच घेतील. पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. एवढेच नाहीतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार असेल, असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.