ETV Bharat / state

NCP Dhananjay Munde : आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात; मुंबईला हलविण्यात येणार - Dhananjay Munde car accident

माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या ( Dhananjay Munde car accident ) वाहनाला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप आहेत.

Dhananjay Munde  car accident
धनंजय मुंडे कार अपघात
author img

By

Published : Jan 4, 2023, 11:40 AM IST

Updated : Jan 4, 2023, 2:14 PM IST

आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात

बीड : आमदार धनंजय मुंडे हे मंगळवारी दिवसभर ( Dhananjay Munde car accident ) मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटपून परळीकडे परतत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी शहरात अपघात झाला. त्यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला ( car accident in Beed Parli ) आहे. काळजी घेण्याचे काही कारण नाही व अफवा पसरवू नका असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.

  • काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे

    — OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धनंजय मुंडे यांना मुंबईत हलविण्यात येणार आहे. अपघाताची माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.

कुठे घडली घटना ? अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. धनंजय मुंडेंना ब्रीज कँडीत हलवणार ( Dhananjaya Munde will move to Breeze Candy ) दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना मार बसला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना मुंबईत विमानाने आणले जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ब्रीज कँडीत दाखल होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागला आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांना परळीतून लातूर येथे नेले जाईल. त्यानंतर विशेष विमानाने त्यांना मुंबईत पुढील उपचारांसाठी हलवले जाईल, अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

कार्यकर्त्यांकडून विश्रांतीचा सल्ला : धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय अन् तरुण नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर सध्या भाजपातील नेत्या पंकजा मुंडे यांचे ते चुलत भाऊ आहेत.

Last Updated : Jan 4, 2023, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.