ETV Bharat / state

नमिता मुंदडा देणार राष्ट्रवादीला 'सोडचिठ्ठी'? 'या' पोस्टमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण - केज विधानसभा मतदारसंघ

केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांचे नाव शरद पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी आहे. याचा परिणाम मुंदडा गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे.

नमिता मुंदडा
author img

By

Published : Sep 22, 2019, 8:07 PM IST

बीड - जिल्ह्यातील 6 मतदारसंघात प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सोशल मीडियावर नेत्यांच्या पोस्ट केल्या जात आहेत. रविवारी अशाच एका सोशल मीडियावरील पोस्टने बीडच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार यांनी ज्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील संघातील नमिता मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मोठा धक्का समजला जातो. केज विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजीला वैतागून मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत असल्याचेही कारण पुढे केले जात आहे.

हेही वाचा - माजलगाव विधानसभा: भाजप समोर अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे आव्हान

केज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षात मोठे खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळून इतर 5 मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी आहे. याचा परिणाम मुंदडा गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे.

नमिता मुंदडा यांची फेसबुक पोस्ट
नमिता मुंदडा यांची फेसबुक पोस्ट

हेही वाचा - परळीत बहीण-भावांची प्रतिष्ठा पणाला; धनंजय मुंडे सोमवारी ठरवणार प्रचाराची व्यूहरचना

या शक्यतो बरोबरच मुंदडा व शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडून शिवसेनेकडून नमिता मुंदडा या उमेदवार असू शकतात, अशी शक्यता देखील राजकीय विश्लेषकाकडून वर्तवली जात आहे.

  • भाजपचाही घोळ मिटेना-

केज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीवरून मोठी खलबते सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी एक शिष्टमंडळ संगीता ठोंबरे यांना उमेदवारी द्या, म्हणून भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून पक्षश्रेष्ठीमध्ये 'असंतोष' आहे. असंतोषाचे कारण म्हणजे केज विधानसभा मतदारसंघातील दुसरे एक शिष्टमंडळ पंकजा मुंडे यांना भेटून संगीता ठोंबरे यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात संगीता ठोंबरे नाहीतर मग उमेदवार कोण? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.

हेही वाचा - कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार??

Intro:'त्या' पोस्ट वरून केज विधानसभा मतदार संघात अस्थिर राजकारणाचे संकेत; प्रमुख पक्षांच्या उमेदवारीत बदलाची शक्यता

बीड- जिल्ह्यातील सहा मतदार संघात प्रमुख पक्ष्यांमध्ये मोठया घडामोडी सुरू आहेत. सोशल मीडियावर नेत्यांच्या पोस्ट केल्या जात आहेत. रविवारी अशाच एका सोशल मीडियावरील पोस्टने बीडच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार यांनी ज्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील संघातील नमिता मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मोठा हादरा समजला जातो. केज विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी वैतागून मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत असल्याचेही कारण पुढे केले जात आहे.

केज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षात मोठे खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळून इतर पाच मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती यामध्ये केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांचे नाव जाहीर केले होते मात्र केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी आहे याचा परिणाम मुंगळा गट राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे. या शक्यते बरोबरच मुंदडा व शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे निकटचे संबंध आहेत. यामुळे त्याची जागा शिवसेनेला सोडून शिवसेनेकडून नमिता मुंदडा या उमेदवार असू शकतात अशी शक्यता देखील राजकीय विश्लेषण करून विश्लेषकाकडून वर्तवली जात आहे.

भाजपचाही घोळ मिटेना-
केज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीवरून मोठे खलबते सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी एक शिष्टमंडळ मंडळ संगीता ठोंबरे यांना उमेदवारी द्या, म्हणून भेटण्यासाठी गेले होते मात्र त्यांच्या उमेदवारीवरून पक्षश्रेष्ठी मध्ये 'असंतोष' आहे. असंतोषाचे कारण म्हणजे दुसऱ्या एक केज विधानसभा मतदारसंघातील शिष्टमंडळ पंकजा मुंडे यांना भेटून संगीता ठोंबरे यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी त्या शिष्टमंडळाने केली आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात संगीता ठोंबरे नाहीतर मग उमेदवार कोण? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.